उद्धव ठाकरेंवर ओढवली नामुष्की!

By admin | Published: February 1, 2017 05:52 AM2017-02-01T05:52:37+5:302017-02-01T05:52:37+5:30

शिवसेना आणि मनसे युतीबाबत चालू असणा-या उलटसुलट चर्चेत मंगळवारी भलतीच कलाटणी मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्याच जनसंपर्क

Uddhav Thackeray blah blah! | उद्धव ठाकरेंवर ओढवली नामुष्की!

उद्धव ठाकरेंवर ओढवली नामुष्की!

Next

मुंबई : शिवसेना आणि मनसे युतीबाबत चालू असणा-या उलटसुलट चर्चेत मंगळवारी भलतीच कलाटणी मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्याच जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर खुलासा करण्याची नामुष्की ओढवली.
मराठी माणसाच्या हितासाठी मनसे बिनशर्त शिवसेनेसोबत युती करायला तयार असल्याचा प्रस्ताव घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकर मातोश्री वारी करुन आले. त्यानंतर उलटसुलट चर्चांचा ऊत आला असतानाच उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी मनसे हा पक्षच शिवसेनेत विसर्जित करण्याचे आवाहन करणारा मेसेज सोशल मीडियात व्हायरल केला. मनसेला खरीच बिनशर्त युती हवी असेल तर लोकसभा निवडणुकीत जसा मोदींना दिला होता तसा द्या, मुंबईत एकही उमेदवार उभा करु नका, असे आवाहन मेसेजमध्ये करण्यात आले होते. शिवाय, मनसेबाबत लोकांचा झालेला भ्रमनिरास आणि पक्षाला लागलेल्या गळतीचा उल्लेख करुन खिल्ली उडविण्यात आली. मनसेला अचानक आलेला हा कळवळा म्हणजे शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाला खीळ घालण्यासाठी भाजपाची सुपारी धेऊन केले जाणारे भावनिक राजकारण असल्याचा आरोपही या मेसेजमध्ये करण्यात आला.
एकीकडे मनसे बिनशर्त युतीचा प्रस्ताव घेऊन आली असताना पक्षच विसर्जित करणाचा सल्ला देणारे आणि जबरी टीका करणारे मसेज थेट पक्षप्रमुखांच्या जनसंपर्क प्रमुखाकडून आल्याने सुरुवातील ती पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचा समज झाला. त्यावरुन गदारोळ उठल्यानंतर खुद्द उद्धव ठाकरे यांनाच याबाबत खुलासा करावा लागला. ‘मी जे बोलेन आणि शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जी माहिती दिली जाईल तीच पक्षाची अधिकृत भूमिका असेल’ असा खुलासा त्यांनी केला. (प्रतिनिधी)

तरच विश्वास बसेल
जर मनसे ने शिवसेनेला बिनशर्त पांठिबा दिला आणि मुंबई महापालिकेत एकही उमेदवार उतरवणार नाही, अशी घोषणा केली तरच मनसेवर विश्वास ठेवता येईल.
अन्यथा, मनसेचा अजेंडा म्हणजे भाजपाची सुपारी आहे हे सिध्द होईल. मराठी माणसांसाठी मनसेनं मुंबई महापालिका निवडणुकीत एकाही जागेवर उमेदवार उभा न करता शिवसेनेच्या स्वाभिमानी लढ्याला साथ द्यावी...!
अशा आशयाचा मेसेज शिवसेना पक्षप्रमुखांच्या जनसंपर्क प्रमुखाकडून पाठविण्यात आला.

Web Title: Uddhav Thackeray blah blah!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.