ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; प्रमोद जठारांचा थेट आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 06:49 PM2020-03-02T18:49:57+5:302020-03-02T18:54:24+5:30

शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतरही रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली आहे. असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. 

Uddhav Thackeray brothers relatives Purchased of land in Nanar Refinary Area; Direct allegations of Pramod Jathar hrb | ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; प्रमोद जठारांचा थेट आरोप

ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; प्रमोद जठारांचा थेट आरोप

Next
ठळक मुद्देनाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाहीनाणार रिफायनरीला विरोध असल्याचे आणि ती होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येऊन सांगून गेले.

मुंबई : नाणार प्रकल्पाला शिवसेनेकडून जोरदार विरोध होत आहे. खासदार विनायक राऊत यांनी तर समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांना झोडून काढण्याचा इशारा जाहीर सभेत दिला होता. मात्र, राजापूरमधील आजच्या समर्थनाच्या सभेमध्ये शिवसैनिक टोप्या आणि गमछे घालून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. याचवेळी भाजपाचे माजी आमदार आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ठाकरे घराण्यावर गंभीर आरोप केले आहेत. 


शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतरही रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली आहे. असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. 


नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली होती. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांची हकालपट्टी केल्याचेही सांगितले. यावर प्रमोद जठार यांनी शरसंधान साधले. 


नाणार रिफायनरीला विरोध असल्याचे आणि ती होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येऊन सांगून गेले. पण याच ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांनी नाणारला लागणारी जमीन खरेदी केली आहे, हिंमत असेल तर पहायला या पुरावे दाखवतो, असा गंभीर आरोप जठार यांनी केला. या आरोपातून जठार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही अप्रत्यक्षपणे नाव घेतले आहे. 

खासदार विनायक राऊतांचा इशारा

नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली होती. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांची हकालपट्टी केल्याचेही सांगितले. या सभेला मंत्री उदय सामंत, आमदार  राजन साळवी व प्रकल्प विरोधी नेते अशोक वालम उपस्थित होते. यावेळी राऊत यांनी शिवसेनेचा गमछा किंवा झेंडा घेऊन कोणी शिवसैनिक रिफायनरीला पाठिंबा देईल त्याची गय केली जाणार नाही हा त्यांनी इशारा समजावा. यापुढे जो शिवसैनिक रिफायनरीचे समर्थन करेल त्याला झोडून काढावे, असेही सांगितले होते. 

'नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकालाही झोडून काढा'

झोडपण्याच्या इशाऱ्यानंतरही शिवसैनिकांकडून नाणारचे खुले समर्थन; सभेला केली गर्दी

तारीख पे तारीख! पुन्हा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली

Web Title: Uddhav Thackeray brothers relatives Purchased of land in Nanar Refinary Area; Direct allegations of Pramod Jathar hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.