उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे?; भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 11:52 AM2022-01-02T11:52:49+5:302022-01-02T11:53:48+5:30

सरकारनं मुंबईतील ५०० स्केअर फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Is Uddhav Thackeray the Chief Minister of Maharashtra or just Mumbai BJPs question | उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे?; भाजपचा सवाल

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त मुंबईचे?; भाजपचा सवाल

googlenewsNext

मुंबई'कर' म्हटल्यावर मुंबईकरांनी काय फक्त करच भरायचे का? मुंबईकरांना सेवा देखील तितक्याच चांगल्या मिळाल्या पाहिजेत या उद्देशातून आणि शिवसेनेनं वचननाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारनं मुंबईतील ५०० स्केअर फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. दरम्यान, यानंतर भाजपनं यावर टीका करत उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे की फक्त मुंबईचे असा सवाल केला आहे. भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्नही विचारले आहेत.

"मालमत्ता करमाफीची घोषणा मुंबई सोबत महाराष्ट्रवासीयांसाठी का नाही?, इतर महापालिका नगरपालिकांमध्ये मराठी माणूस राहत नाहीत का?, मराठी माणसात भेदाभेद कशाला करत आहात?," असे सवाल उपाध्ये यांनी केले आहेत.

 
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
जनतेला खोटी वचनं द्यायची नाहीत असे संस्कार शिवसैनिकावर आहेत. निवडणुकीआधी शिवसेनेच्या वचननाम्यात मुंबईकरांना ५०० स्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार असं आश्वासन दिलं होतं. ते पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Web Title: Is Uddhav Thackeray the Chief Minister of Maharashtra or just Mumbai BJPs question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.