"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 01:53 PM2024-05-30T13:53:23+5:302024-05-30T14:06:54+5:30

Uddhav Thackeray : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधून ३७ कंपन्या परराज्यात गेल्यानंतर आता ठाकरे गटाने महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray criticizes Eknath Shinde Government as companies in Pune Hinjewadi moved out of the state | "तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट

"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट

Hinjewadi IT Park  Componies : राज्यातील उद्योग परराज्यात जाण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत असतात. राज्यात बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असताना उद्योगधंदे शेजारच्या राज्यात जात असल्याने ठाकरे गटाकडून सत्ताधारी महायुतीवर सातत्याने टीका केली जातेय. अशातच पुण्यातील हिंजेवाडीमधून आयटी कंपन्या राज्याबाहेर गेल्या असल्याची माहिती समोर येताच ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रीय कारभाराचा परिणाम असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुण्यातील हिंजवडीमधील आयटी पार्कमध्ये जवळपास इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा यांच्यासारख्या जवळपास १५० कंपन्या आहेत.या हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये जवळपास ५ लाखांच्या आसपास कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांमध्ये रोज लाखो कर्मचारी कामासाठी येत असतात. त्यामुळे सहाजिकपणे इथल्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांना अनेक तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागते. त्यामुळे कामावार वेळेत पोहोचता येत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहेत. कामावरुन घरी जाताना देखील अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या सगळ्यामुळे आयटी कंपन्यांनी आता हिंजवडीमधून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयावरुन आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.  वाहतुकीच्या समस्यांमुळे आयटी कंपन्यांचे रोज मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. यावरुन ठाकरे गटाने सत्ताधारी महायुती सरकावर टीका केली आहे. आधीचे बरेच उद्योग राज्याबाहेर गेल्याने आता आयटी कंपन्या परराज्यात जात असल्याने ठाकरे गटाने सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.

"घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल ३७ आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे. महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, याआधी देखील वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस-टाटा, बल्क ड्रग पार्क, सेफ्रॉन यासारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटले होते. या प्रक्लपांवरुन देखील मोठ्या प्रमाणात राजकारण झालं होतं.

Web Title: Uddhav Thackeray criticizes Eknath Shinde Government as companies in Pune Hinjewadi moved out of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.