वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंनी मागितली जाहीर माफी

By Admin | Published: October 1, 2016 02:04 PM2016-10-01T14:04:52+5:302016-10-01T14:34:42+5:30

मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चाबद्दल छापण्यात आलेल्या व्यंगचित्राद्वारे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता असे सांगत उद्धव ठाकरेंनी माफी मागितली.

Uddhav Thackeray demands apology on controversial cartoon | वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंनी मागितली जाहीर माफी

वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंनी मागितली जाहीर माफी

googlenewsNext
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चाबद्दल छापण्यात आलेल्या व्यंगचित्रावरून जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे मला खूप दुख: झालं. मात्र ते केवळ एक व्यंगचित्र होते, त्याद्वारे कोणालाही दुखावण्याचा व अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता, असं सागंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागितली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
 
'व्यंगचित्रातून भावना दुखावण्याचा हेतू नव्हता मात्र जर कोणा माता - भगिनीच्या भावना दुखावल्या असतील तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि सामना संपादक म्हणून त्यांची जाहीर माफी मागतो,' असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.  
 
(सेनेला ‘मुका’मार!)
('त्या' व्यंगचित्राप्रकरणी अखेर सामनाकडून दिलगिरी)
(संजय राऊत यांच्याविरुद्ध खदखद)
 
'शिवाजी महाराज ज्या एकविरा देवीसमोर नतमस्तक व्हायचे, तीच आमचीही कुलदेवी आहे. स्वत: शिवसेनाप्रमुखही देवीसमोर लीन होत. त्याच बाळासाहेबांचा मी पुत्र आहे आणि शिवसैनिक त्याच भावाने स्त्रियांसमोर नतमस्तक होतात. जी व्यक्ती मता- भगिनींचा अपमान करेल, ती शिवसैनिक असूच शकत नाही. त्यामुळे या व्यंगचित्रावरून जी राळ उठवली गेली, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तो माझ्या जिव्हारी लागला आहे. सामनात छापून आलेले केवळ एक व्यंगचित्र होते, पण त्यावरून मोठा वाद निर्माण केला गेला. तरीही मी सर्व माता-भगिनींची जाहीर माफी मागतो', असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
'व्यंगचित्राच्या वादावरून उगाच राजीनाम्याच्या अफवा पसरवल्या गेल्या.  मात्र लोकांचा शिवसैनिकांवरील विश्वास कमी झालेला नाही. आम्हाला अनेकांनी हरवण्याचा, नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही सर्वांना पुरून उरलो, ' असे उद्धव म्हणाले. 
 
'मराठा आरक्षण विषयावर लवकरात लवकर एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं. सर्व नेत्यांना विधीमंडळात आपली भुमिका मांडायला लावा जेणेकरुन आपला शब्द फिरवून लोकांच्या भावनांशी खेळणार नाहीत,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

Web Title: Uddhav Thackeray demands apology on controversial cartoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.