चांगल्या योजना बंद करून उद्धव ठाकरे सुडाचं राजकारण करतायत: अनिल बोंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 01:03 PM2020-01-11T13:03:19+5:302020-01-11T13:07:04+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले चांगले काम पुसून टाकण्याचा हा अट्टाहास आहे, असा आरोप सुद्धा अनिल बोंडे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray is doing politics by closing good plans: Anil Bonde | चांगल्या योजना बंद करून उद्धव ठाकरे सुडाचं राजकारण करतायत: अनिल बोंडे

चांगल्या योजना बंद करून उद्धव ठाकरे सुडाचं राजकारण करतायत: अनिल बोंडे

Next

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यंमत्री पदाची शपथ घेतली. त्यांनतर नव्या सरकारने मागच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय व योजनांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे भाजप नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी याच मुद्यावरून मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ठाकरे सरकारकडून जलयुक्त शिवार योजना थांबवण्यात आली आहे. तर या योजनेला स्थगिती देऊन निधी बंद करुन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढण्यात आले असून, ही अतिशय चिंतेची बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोंडे म्हणाले. तर चांगल्या योजना बंद करून उद्धव ठाकरे सुडाचं राजकारण करतायत असा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.

तसेच जलयुक्त शिवार ही योजना आता रोजगार हमी योजनेत टाकल्याने पुढील 5 वर्षात होणाऱ्या कामांना 25 वर्षे लागणार आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले चांगले काम पुसून टाकण्याचा हा अट्टाहास आहे, असा आरोप सुद्धा अनिल बोंडे यांनी केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली गेलेली जलयुक्त शिवार योजनेला या सरकारने ब्रेक लावले आहे. कारण, ३१ डिसेंबरला या योजनेची मुदत संपल्यानंतर नव्या सरकारने त्यास मुदतवाढ दिलेली नाही. तसेच यापुढे या योजनेस निधी न देण्याची भूमिका घेतली आहे. रोजगार हमी योजनाव्यतिरिक्त जलयुक्तसाठी एखाद्या अधिकाऱ्याने निधीची तरतूद केली तर तो गैरव्यवहार केला असे समजून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश सुद्धा देण्यात आले आहे.

 

 

Web Title: Uddhav Thackeray is doing politics by closing good plans: Anil Bonde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.