उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:13 IST2025-01-21T14:12:58+5:302025-01-21T14:13:59+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे. 

Uddhav Thackeray group Chhatrapati Sambhajinagar city chief Vishwanath Swamy, along with 35 others, will quit the party and join the BJP | उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

छत्रपती संभाजीनगर - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला गळती सुरू झाली आहे. नुकतेच पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा देत पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संभाजीनगर येथील शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व शहरप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. स्वामी यांच्यासोबत पक्षातील ३५ पदाधिकाऱ्यांनीही सोडचिठ्ठी दिली आहे.

पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

पक्षात मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप करून विश्वनाथ स्वामी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे

शिवा लुंगारे - उपजिल्हाप्रमुख
प्रकाश अत्तरदे - माजी नगरसेवक
साहेबराव घोडके - ज्येष्ठ शिवसैनिक 
राजू खरे - ज्येष्ठ शिवसैनिक
सुदाम देहाडे - विभागप्रमुख
नागनाथ स्वामी - विभागप्रमुख
रोहिदास पवार - शाखाप्रमुख
प्रकाश हांडे - उपविभाग प्रमुख
शिवशंकर स्वामी - उपशाखाप्रमुख
मनोहर विखणकर - गटप्रमुख
अजिंक्य देसाई - गटप्रमुख
पंतू जाधव - गटप्रमुख
मनोज नर्बदे - शिवसैनिक
अनंत वराडे
वसंत देशमुख
सुभाष नेमाने
रमेश गल्हाटे
गौतम भारस्कर
विठ्ठल सोनवणे
तुकाराम घोडजकर
रवी बनकर
रोहित स्वामी - युवासेना उपशहरप्रमुख
राहुल पाटील - उपशाखाप्रमुख
योगेश चौधरी - उपशाखाप्रमुख
बाबू स्वामी - गटप्रमुख
आकाश बिडवे - युवासेना
निखिल पडूळ - युवासेना
चैतन्य जोशी - युवासेना
ऋषिकेश भालेराव - युवासेना
तुषार पाथ्रीकर - युवासेना
मयुरेश जाधव - युवासेना
रोहन स्वामी - युवासेना
सूर्यकांत मानकापे - युवासेना
आयुष शेडगे - युवासेना
सर्वज्ञ पोफळे - युवासेना 

सोमवारीच एकनाथ पवारांनी दिला राजीनामा

ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी सुषमा अंधारे, विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत पक्ष सोडला आहे. एकनाथ पवार यांनी नांदेडमधल्या लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. माझ्या पक्षातील काही लोकांनी पराभूत करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. कालच त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि आज छत्रपती संभाजीनगरमधील शहरप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे. 

Web Title: Uddhav Thackeray group Chhatrapati Sambhajinagar city chief Vishwanath Swamy, along with 35 others, will quit the party and join the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.