“अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा,” रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 07:39 AM2023-01-03T07:39:26+5:302023-01-03T07:40:19+5:30

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसली आहे.

uddhav thackeray group mla ambadas danve targets bjp national president j p nadda maharashtra rally shares video | “अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा,” रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाचा टोला

“अहो नड्डा, जरूर पहा हा खड्डा,” रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाचा टोला

Next

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राज्यातील १८ लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने मिशन सुरू केले आहे. नड्डा यांची सोमवारी आधी चंद्रपुरात सभा पार पडली. त्यानंतर त्यांची औरंगाबादमध्येही सभा झाली. परंतु त्यांच्या औरंगाबादमधील सभेत अनेक खुर्चा रिकाम्या असल्याचा दावा ठाकरे गटाच्या आमदाराकडून करण्यात आला असून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच त्यांनी व्हिडीओ शेअर करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्यावर टीकेचा बाण सोडलाय. “अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा..” असं ट्वीट त्यांनी केलंय.

“अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा…लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे,” असं ट्वीट अंबादास दानवे यांनी केलंय.

काय म्हणाले होते नड्डा?
“जग जेव्हा संकटातून जात आहे, प्रत्येक देश या संकटातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. मंदीच्या दिवसातही भारत ब्रिटनला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर गेला आहे. या मंदीच्या दिवसातही भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. आज अमेरिका आणि रशिया संकटातून जात आहेत, पण, भारत अर्थव्यवस्था स्थीर करण्याचा प्रय़त्न करत आहे. आज आपण स्टीलमध्ये जगात दोन नंबरला आहे. आपल्या देशात ५७ टक्के मोबाईल बनवले जातात, असंही जे.पी.नड्डा म्हणाले. 

Web Title: uddhav thackeray group mla ambadas danve targets bjp national president j p nadda maharashtra rally shares video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.