“अमृता फडणवीस शुद्ध आणि पवित्र पण..,” ‘त्या’ प्रकरणावरून ठाकरे गटानं केलं फडणवीसांना टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 09:17 AM2023-03-17T09:17:34+5:302023-03-17T09:18:23+5:30

या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे, असं म्हणत ठाकरे गटाकडून जोरदार टीका. 

uddhav thackeray group saamana editorial targets dcm devendra fadnavis old pension strike amruta fadnavis bribe case | “अमृता फडणवीस शुद्ध आणि पवित्र पण..,” ‘त्या’ प्रकरणावरून ठाकरे गटानं केलं फडणवीसांना टार्गेट

“अमृता फडणवीस शुद्ध आणि पवित्र पण..,” ‘त्या’ प्रकरणावरून ठाकरे गटानं केलं फडणवीसांना टार्गेट

googlenewsNext

‘फडणवीस यांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच काहीशी झाली आहे किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा ‘खोका’ अवस्थेला ते पोहोचले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या विरोधात असताना तुम्ही राजकीय विरोधकांचेच काटे काढणार असाल तर काट्याने काटा काढण्याचे तंत्र इतरांनाही अवगत आहे,’ असे म्हणत ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेचा बाण सोडला.

'अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले. जरी सौ. अमृतावहिनींनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे. प्रश्न इतकाच आहे की, या प्रकरणातील जे कोणी लाच देण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांची हे करण्याची हिंमत झालीच कशी?’ असा सवाल सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आलाय.

काय म्हटलेय संपादकीयमध्ये?
‘लाच देण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांची हे करण्याची हिंमत झालीच कशी? म्हणजेच या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे. ‘लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे व त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो. गौतम अदानी यांच्या भ्रष्टाचारावर, दरोडेखोरीवर महाराष्ट्राचे सरकार गप्प आहे. ‘एलआयसी’चे मुख्यालय मुंबईत मंत्रालयासमोर आहे. अदानीच्या नादी लागून एलआयसीने जनतेच्या पैशाची लूट केली व आता विरोधकांनी ‘एलआयसी’च्या दरोडेखोरीवर आक्षेप घेतला म्हणून ‘योगक्षेम’सुद्धा मुंबईतून हलवला जाईल,’ असे त्यात नमूद करण्यात आलेय.

कायद्याचे राज्य कोसळतेय
या राज्यात सध्या काहीही घडू शकते. कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. ते असेच कोसळत राहिले तर महाराष्ट्र कोसळेल व महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडेच तडे जातील. त्यास सुरुवात झाली असल्याचे म्हणत संपादकीय मधून निशाणा साधण्यात आलाय.

Web Title: uddhav thackeray group saamana editorial targets dcm devendra fadnavis old pension strike amruta fadnavis bribe case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.