Uddhav Thackeray Live: माझ्या लोकांनाच मी मुख्यमंत्री नको असेन तर...; उद्धव ठाकरेंची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:56 PM2022-06-22T17:56:37+5:302022-06-22T17:57:49+5:30

शिवसेना आणि हिंदुत्व वेगळी नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कुणी काय केले हे सांगण्याची वेळ नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray: If I don't want my own people to be the CM Will Resign; Uddhav Thackeray's emotional appeal to mla | Uddhav Thackeray Live: माझ्या लोकांनाच मी मुख्यमंत्री नको असेन तर...; उद्धव ठाकरेंची भावनिक साद

Uddhav Thackeray Live: माझ्या लोकांनाच मी मुख्यमंत्री नको असेन तर...; उद्धव ठाकरेंची भावनिक साद

Next

मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होता. पण माझ्या लोकांनाच मी नको. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा इथे माझ्याशी चर्चा करायला हवी होती. एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो. उगाच का असं करताय? मी राजीनामा तयार करून ठेवला. या आणि राजभवनात पत्र घेऊन जा, सत्तेसाठी मी लाचार नाही असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले. 

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. हिंदुत्वाच्या मुद्दयावरून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सरकार करावं अशी मागणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना आणि हिंदुत्व वेगळी नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कुणी काय केले हे सांगण्याची वेळ नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा विधानसभेत बोलणारा मी मुख्यमंत्री आहे. काहीजण ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं भासवण्याचा प्रयत्न करतायेत. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच आपण पुढे घेऊन चाललोय. विचार, मुद्दा तोच आहे. २०१४ मध्ये प्रतिकुल परिस्थिती शिवसेनेने ६३ आमदार निवडून आले. पहिल्या मंत्रिमंडळात आणि आत्ताच्या मंत्रिमंडळात तेच मंत्री होते. मधल्या काळात जे काही मिळाले शिवसेनेने मिळालं हे लक्षात ठेवा असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांचे फोन येतायेत, आम्हाला परत यायचंय. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्यादिवशी हॉटेलमध्ये गेलो. तेव्हा म्हटलं, शिवसैनिक मरमर मरतात आणि निवडून आणतात. बाथरूमला गेला तरी संशय ही कुठली लोकशाही. बाळासाहेबांनाही हे पटणारं नाही आणि मलाही पटणारं नाही. मी इच्छेपेक्षा जिद्दीने करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीने मी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पाळला. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाज असल्याने वेगळा मार्ग पत्करावा लागला. जे काही घडले सगळ्यांना माहिती आहे असं त्यांनी सांगितले. 

'त्या' बैठकीत काय घडलं?
सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी बैठकीनंतर मला बोलावलं. तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. कारण दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते होते. मग जिद्दीने अनुभव नसताना मी जबाबदारी स्वीकारली. राजकारणात वळणं असतात. आजपर्यंत मला प्रशासनाने खूप सहकार्य केले. होय, मला धक्का बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगितले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर समजू शकतो. दोघांची विचारसरणी वेगळी आहे. मात्र त्या दोघांनी माझ्यावर भरवसा ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नको असतील तर राजीनामा देण्यास तयार आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

शिवसैनिकांना आवाहन
ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

Read in English

Web Title: Uddhav Thackeray: If I don't want my own people to be the CM Will Resign; Uddhav Thackeray's emotional appeal to mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.