Uddhav Thackeray Interview : "...हा 'आमच्या' आणि 'त्यांच्या' हिंदुत्वातला फरक", उद्धव ठाकरेंनी दिला बाळासाहेबांचा रेफरन्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 09:49 IST2022-07-26T09:45:49+5:302022-07-26T09:49:33+5:30
शिवसेनेचे राज्यसभा खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी, महाराष्ट्रातील सरकार का पाडले, कसे पाडले, शिवसेनेचे भवितव्य येथपासून ते हिंदुत्वापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले.

Uddhav Thackeray Interview : "...हा 'आमच्या' आणि 'त्यांच्या' हिंदुत्वातला फरक", उद्धव ठाकरेंनी दिला बाळासाहेबांचा रेफरन्स!
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडाचे निशाण फडकावले. यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजपने खुद्द एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घेषणा केली. शिंदेंसोबत शिवसेनेचे एक-दोन नव्हे, तर तब्बल 40 वर आमदार या बंडात सहभागी झाले. बंड करणारे हे सर्वच शिवसैनिक आमदार, आम्ही हिंदूत्वासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहोत, असे म्हणत आहेत. भाजपही वारंवार हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर प्रहार करताना दिसते. आता याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर आणि भाजपवही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे हिंदुत्व कसे वेगळे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.
ठाकरे आणि शिवसेना नातं तोडून दाखवा; उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान
शिवसेनेचे राज्यसभा खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी, महाराष्ट्रातील सरकार का पाडले, कसे पाडले, शिवसेनेचे भवितव्य येथपासून ते हिंदुत्वापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. याच वेळी हिंदुत्वावर बोलताना, "शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केले, ते हिंदुत्व मजबूत व्हायला हवे म्हणून! पण हे राजकारणासाठी हिंदुत्व वापरतायत. हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक आहे," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेच्या बाबतीत विश्वासघाताचं राजकारण का होतं?; उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही प्रोफेशनली…”
यावेळी, शिवसेना का संपवायची आहे, असे वाटते आपल्याला... आतापर्यंत गेल्या 56 वर्षांत शिवसेना संपवण्याचे प्रयत्न अनेकांनी केले... असे संजय राऊत यांनी विचारले असता, "अनेक... अनेक... आणि प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमाने आणि तेजाने उभी राहिली. आतासुद्धा त्यांना हिंदुत्वाशी फारकत नको असेल, तर माझं हे नेहमीच म्हणणं आहे की, शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केले ते हिंदुत्व मजबूत व्हायला हवे म्हणून! पण हे राजकारणासाठी हिंदुत्व वापरतायत. हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक आहे. ते विचारतायत ना तुमच्या आणि भाजपच्या हिंदुत्वातला फरक काय, तर तो हा फरक आहे. शिवसेनेचे राजकारण हे आम्ही हिंदुत्व मजबूत होण्यासाठी केले. पण त्यांचे राजकारण मजबूत करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व वापरले," असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
ठाकरे आणि शिवसेना नातं तोडून दाखवा; उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान