'आपण कशा लोकांसोबत काम करत आहोत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल, म्हणूनच आम्हाला भावी सहकारी म्हणाले'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 01:13 PM2021-09-17T13:13:17+5:302021-09-17T13:16:14+5:30
Devendra Fadanvis on Uddhav Thackerays statement: 'मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनातील युतीबद्दलची भावना बोलून दाखवली'
मुंबई: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. कार्यक्रमात शिवसेनेसह भाजपचेही अनेक नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
https://t.co/HOPWoFCtiB
— Lokmat (@MiLOKMAT) September 17, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे हुतात्म्यांना अभिवादन केले. #UddhavThackeray#aurangabad
मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर फडणवीस म्हणाले, 'आजच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी...', दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान, सर्वांच्या भुवया उंचावल्या!https://t.co/6UK5hA23po
— Lokmat (@MiLOKMAT) September 17, 2021
आम्ही सक्षम विरोधी पक्ष
फडणवीस पुढे म्हणाले की, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण, सध्याची परिस्थिती तशी नाही. आम्ही सध्या सक्षम विरोधी पक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, असंही ते म्हणाले.