मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढणार आहे का? उद्धव ठाकरेंचे पाचोऱ्यातून आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 08:55 PM2023-04-23T20:55:17+5:302023-04-23T20:55:49+5:30
Uddhav Thackeray Speech: उद्धव ठाकरेंची आज जळगावच्या पाचोऱ्यामध्ये सभा झाली. यामध्ये ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, भाजपावर शरसंधान साधले.
40 गद्दार गेले फरक पडणार नाही. यांना जसे घोड्यावर चढविले तसे खाली खेचण्याची वेळ आलीय. निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झालाय, त्यांना ही गर्दी दिसणार नाही. पाकिस्तानला विचारा शिवसेना कोणाची, ते सांगतील, असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. याचबरोबर ठाकरे यांनी शिंदे गटावरून भाजपाला आव्हान दिले आहे.
उद्धव ठाकरेंची आज जळगावच्या पाचोऱ्यामध्ये सभा झाली. यामध्ये ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, भाजपावर शरसंधान साधले. कोरोना काळात राज्यावर संकट होते. तेव्हाच आपले सरकार होते. तेव्हा तुम्हाला मदत मिळाली की नाही हे सांगा. कोण आला रे कोण आला, गद्दारांचा बाप आला अशी घोषणा ऐकली. नाही रे बाबांनो. माझी अवलाद अशी असू शकत नाही. यांना स्वत:चे काही नाहीय. ढेकणं मारायला तोफ लागत नाही, एक बोट लागते, असे ठाकरे म्हणाले.
भाजपा आव्हान अजिबात नाहीय, परंतू जोवर भाजपा राज्यात आणि देशात सत्तेवर असेल तोवर ते जे राज्याचे नुकसान करतील ते कसे भरून काढायचे हे माझ्यासमोर आव्हान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. लवकरच निवडणुका लागतील. या गद्दाराला गाडायचे आहे. आज मी पाचोऱ्यात आलो. पाचोरा जिवंत आहे. या चोरांचा आणि गद्दारांचा भगव्यावर हक्क असू शकत नाही. खारघरला गेल्या रविवारी जे घडले. १५ अधिकृत जाहीर केलेले सांगतोय. समजा मी महाराज आहे, मी नाहीय. पण तुम्ही शिष्य असाल तर तुम्हाला भारावून त्याची मते मिळवायची. या लोकांनी आजवर दुसऱ्यांचे बापच चोरलेत, असा आरोप ठाकरेंनी केला.
भाजपाला माझे जाहीर आव्हान आहे. मिंधेंच्या नेतृत्वाखाली भाजपा महाराष्ट्रातील निवडणुका लढणार आहे का, बावनकुळेंनी सांगावे त्या ४८ जागा देणार का, आणखी एक आव्हान देतो. आमचे चोरलेले शिवधनुष्य घेऊन या, होऊन जाऊद्या. महाराष्ट्र हा गद्दारांचा नाही. त्यांच्यात हिंमत नाही. पावसाळ्यापूर्वी नाही आताच निवडणूक लावा. आम्ही मशान घेऊन येतो, तुम्ही धनुष्यबाण घेऊन या. मशालीची धग अशी लावू की तुमचे सिंहासन जाळून टाकू, असा इशारा आणि आव्हान ठाकरेंनी दिले.