उद्धव ठाकरे यांना निमंत्रणच नाही !
By Admin | Published: January 16, 2016 01:04 AM2016-01-16T01:04:00+5:302016-01-16T01:04:00+5:30
मराठीच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी जी शिवसेना लढली, त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाही, अशी खंत व्यक्त करत
पिंपरी चिंचवड : मराठीच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी जी शिवसेना लढली, त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाही, अशी खंत व्यक्त करत
अशा संमेलनात शिवसैनिकांनी जायचे का, असा सवाल परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे. आपण संमेलनाला येणार का, या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विविध विषयांवर रेखाटलेल्या कुंचल्याचे फटकारे या व्यंगचित्र प्रदर्शनाचे दालन संमेलनातील ग्रंथप्रदर्शनात आहे. या दालनाचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आमच्या दृष्टीने साहित्य संमेलन संपले आहे, त्याचे सूप वाजले आहे. यापूर्वी संमेलनाआधी संमेलनाध्यक्षांचा परिचय होत नव्हता. तो परिचय झाला. तसेच, त्यांचा हट्टीपणाही खूप झाला. स्वाभिमान असणारा संमेलनाध्यक्ष हवा होता; त्यांच्या ज्ञानावर, लिखाणावर बोलण्याचा माझा अधिकार नाही. संमेलनाध्यक्ष म्हणतात, इंग्रजी ज्ञानभाषा आहे, हिन्दी राष्ट्रभाषा आहे, तर मग मराठी कुठे आहे?, असा सवालही त्यांनी केला.