उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ'; देवेंद्र फडणवीसांना दिलं ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 05:56 PM2022-11-26T17:56:41+5:302022-11-26T17:57:24+5:30

व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले.

Uddhav Thackeray open challenge was given to DCM Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ'; देवेंद्र फडणवीसांना दिलं ओपन चॅलेंज

उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ'; देवेंद्र फडणवीसांना दिलं ओपन चॅलेंज

googlenewsNext

बुलढाणा - मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं होतं. केवळ घोषणा केली नव्हती. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली की नाही असं विचारलं होतं. तेव्हा शेतकऱ्याने होय कबुली दिली होती. माझं उघड आव्हान आहे. जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वीजबिल माफ केलं नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, ओला दुष्काळ आला तरी कृषी मंत्री म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज काय? जो शेतकरी राबतोय तो आज विचारतोय मी खायचं काय? शिव्या खावून तुमचं पोट भरत असेल पण माझ्या शेतकऱ्यांचे पोट कसे भरणार ते सांगा. पीक विमा कंपन्यांची मस्ती पुन्हा उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 

देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज
व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझं आव्हान आहे. जी कर्जमुक्ती आम्ही केली तिचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली होती. तेव्हा सरकारने बँकेला गॅरंटी देऊन माफ करायला लावली होती. मात्र तोपर्यंत या रेड्यांनी शेण खाल्ले. कुणाचं नुकसान झाले? अतिवृष्टीचे पैसे कुणाला मिळाले त्यांनी हात दाखवावं. राज्य खोटं बोलून चाललं आहे. काही वाटेल ते चालले आहे. ही जनता भोळीभाबडी राहिली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

भाजपा नव्हे तर भाकड पक्ष
विचार संपले, नेते संपले भाकड पक्ष झाला आहे. बाहेरच्या पक्षातून आयात केलेले नेते किती याची यादी करा. मनावर दगड ठेऊन आम्ही मुख्यमंत्री बसवलाय असं चंद्रकांत पाटील म्हणाले. हा आयात पक्ष आहे. त्यांची दादागिरी तुम्ही सगळे मर्दमावळे मोडून टाकणार नाही? हा चोर पक्ष आहे. मी ४० रेड्यांना, गद्दारांना विचारतोय. आम्ही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही हे जाहीर सांगावं. यांना केवळ नाव बाळासाहेबांचं, चेहरा बाळासाहेबांचा आणि आशीर्वाद मोदींचा तुमची मेहनत कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 
 

Web Title: Uddhav Thackeray open challenge was given to DCM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.