Uddhav Thackeray | पहावं ते नवलंच... 'पशुसंवर्धन'च्या फिरत्या दवाखान्यावर अजूनही 'ठाकरे'च मुख्यमंत्री!

By प्रमोद सुकरे | Published: December 31, 2022 09:09 PM2022-12-31T21:09:57+5:302022-12-31T21:11:09+5:30

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार;छबी बदलणार कोण?

Uddhav Thackeray photo on Mobile Van Clinic as Chief Minister even after 6 months of resignation | Uddhav Thackeray | पहावं ते नवलंच... 'पशुसंवर्धन'च्या फिरत्या दवाखान्यावर अजूनही 'ठाकरे'च मुख्यमंत्री!

Uddhav Thackeray | पहावं ते नवलंच... 'पशुसंवर्धन'च्या फिरत्या दवाखान्यावर अजूनही 'ठाकरे'च मुख्यमंत्री!

googlenewsNext

प्रमोद सुकरे

लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: सध्या लंपीचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तो रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आटोकाट प्रयत्न करीत आहे. पशुसंवर्धन विभागाचा फिरता दवाखानाही गावोगावी जाऊन जनावरांची तपासणी व औषधोपचार करीत आहे .पण या फिरत्या दवाखान्यावर मुख्यमंत्री म्हणून अजूनही उद्धव ठाकरेंचीच छबी दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला नेमके मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न पडतोय.

महाराष्ट्राच्या राजकारणात गत चार-पाच महिन्यापूर्वी मोठी उलथा पालथ झाली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतली आणि तेच सध्या कारभार हाकत आहेत. मात्र फिरत्या दवाखान्यावरील उद्ध्व ठाकरेंची छबी मात्र अजूनही बदललेली दिसत नाही. सध्या लम्पीचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत.  पशुसंवर्धन विभागाच्या फिरत्या दवाखान्या मार्फत परिसरात जनावरांची तपासणी करण्यात येत आहे. पण या फिरत्या दवाखान्याच्या गाडीवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची छबी शेतकऱ्यांना पाहायला मिळातेय. सध्या मुख्यमंत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडतोय.

खरं तर कोणत्याही सत्तेत बदल झाला की सगळ्याच विभागात तातडीने बदल व्हायला सुरुवात दिसते. त्याची अनेक उदाहरणेही सांगता येतील. पण पशुसंवर्धन विभागाच्या फिरत्या दवाखान्याच्या गाडीवर मुख्यमंत्री म्हणून असणारी ठाकरेंची छबी अजूनही कायम आहे याचे आश्चर्य वाटते.

बदल कोणी करायचा?

फिरत्या दवाखान्यासाठी दिलेल्या या गाड्या या शासनाने दिलेल्या आहेत. जेव्हा या गाड्या दिल्या गेल्या त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यांची छबी त्यावर तयार करण्यात आली आहे. आता जरी नेतृत्वात बदल झाला असला तरी ही छबी नक्की बदलायची कोणी? असा प्रश्न खाजगीत पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी करताना दिसतात.

राज्यात ७२ फिरते दवाखाने

जनावरांच्या उपचारासाठी फिरत्या दवाखान्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी राज्य सरकारने ७२ गाड्या खरेदी करत त्याला फिरत्या दवाखान्याचे रूप दिले गेले. त्यात सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र कराडातीलच नव्हे तर राज्यातील या सर्वच गाड्यांवर अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची छबी असल्याचे पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी खाजगीत सांगतात.

म्हणे अजून फिरते दवाखाने वाढणार!

सध्या लंम्पीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडे शासनाचे विशेष लक्ष आहे. लम्पीला आवर घालण्यासाठी फिरत्या दवाखान्याची गरज वाटू लागली आहे. प्रत्येक तालुक्याला हा फिरता दवाखाना देण्याची धोरण दिसते त्यामुळे अजून  फिरते दवाखाने वाढणार असल्याचेही चर्चा आहे.

"फिरत्या दवाखान्याची संकल्पना जेव्हा समोर आली तेव्हा शासनाने या गाड्या खरेदी करून जिल्हास्तरावर पाठवल्या आहेत.आपल्या सातारा जिल्हाला ३ गाड्या मिळाल्या आहेत. त्याच वेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांची छबी त्यावर निश्चित केली आहे. आम्हा अधिकाऱ्यांचा त्यामध्ये कोणताही सहभाग किंवा हेतू नाही.लोकमतने ही बाब लक्षात आणून दिली आहे.  याबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागून योग्य ती कार्यवाही करू," असे अंकुश परिहार (उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग) यांनी सांगितले.

Web Title: Uddhav Thackeray photo on Mobile Van Clinic as Chief Minister even after 6 months of resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.