सर्व आरोपांवर उत्तरं देण्यास बांधील नाही; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
By देवेश फडके | Published: February 28, 2021 07:15 PM2021-02-28T19:15:24+5:302021-02-28T19:34:48+5:30
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कोरोना, पेट्रोल-डिझेल दरवाढ ते संजय राठोड यांसारख्या विषयांवर विरोधकांनी केलेल्या आरोपांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेत विरोधकांनी केलेल्या सर्व आरोपांवर उत्तरे देण्यास बांधील नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कोरोना, पेट्रोल-डिझेल दरवाढ ते संजय राठोड यांसारख्या विषयांवर विरोधकांनी केलेल्या आरोपांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेत विरोधकांनी केलेल्या सर्व आरोपांवर उत्तरे देण्यास बांधील नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (uddhav thackeray replied opposition over various issues)
कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. गेल्या काही महिन्यांच्या अनुभवावरून शहाणे होत आता आणखी जास्त खबरदारी घेण्यात आलेली असे सांगत कोरोनासंदर्भात विरोधकांकडून होणारे आरोप हे दुटप्पी आहे, असा दावा केला आहे. धारावी पॅटर्नचे जगात कौतुक करण्यात आले. याचे श्रेय कुणाला हा मुद्दा नाही. परंतु, चर्चेत राहण्यासाठी एकीकडे कोरोना योद्धांचा सन्मान करून त्यांच्यासोबत फोटो काढायचे आणि दुसरीकडे सरकारवर दररोज नवनवीन आरोप करत राहायचे. ही विरोधकांची दुटप्पी भूमिका मान्य नाही. विरोधकांनी जबाबदारीने बोलायला हवे, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील
सावरकरांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून करण्यात आलेल्या टीकेलाही उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी होती की, जयंती हे ज्यांना माहिती नाही, त्यांनी सरकारवर टीका करू नये, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
विरोधकांची कीव करावीशी वाटते
कशातच काही नसताना फक्त आरोप करत सुटायचे, हा नवीन ट्रेंड आला आहे. कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तो बिलकूल मान्य नाही. विरोधकांचे आरोप म्हणजे नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे. आरोप सिद्ध करून न दाखवणाऱ्या विरोधकांची कीव करावीशी वाटते, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय: तृप्ती देसाई
तुमचे सरकार असताना सीमाप्रश्न का सुटला नाही
सीमाप्रश्नी सर्वपक्षीय एक आहोत. आम्ही सरकारसोबत आहोत. सीमाप्रश्न सुटला पाहिजे, असे म्हणणाऱ्यांनी केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार असताना तेव्हाच सीमाप्रश्न का सोडवला नाही, असा रोकडा सवाल विरोधकांना केला आहे. अधिवेशन सुरू होणार म्हणून काहीही बोलायचे. विरोधकांच्या सर्व प्रश्नांना आणि आरोपांना उत्तरे देण्यास बांधील नाही, असेही ते म्हणाले.
शिवसेना खून, बलात्कार करणाऱ्यांना पाठिशी घालतेय; नारायण राणेंचा आरोप
केंद्रातील सरकार ओरबाडायला बसलेय
आम्ही आतापर्यंत सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांची शतके पाहिली. मात्र, पेट्रोल दराने गाठलेले शतक पहिल्यांदा पाहिले. अनेक प्रश्नांवर आंदोलन करत असलेले विरोधक पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसंदर्भात गप्प का बसतात. इंधन दरवाढीविरोधातही आंदोलन करावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केले आहे. केंद्रातील सरकार सगळं ओरबाडायला बसलेय. केंद्राच्या सोयीनुसार आणि त्यांच्या तुंबड्या भरणारी कररचना केली जाते. जीएसटीचे अद्यापही २९ हजार कोटी रुपये राज्याला येणे बाकी आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.