शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 04:46 PM2024-11-08T16:46:17+5:302024-11-08T16:47:49+5:30

'शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते.'

Uddhav Thackeray : saffron flag does not look good in the hands of robbers; Uddhav Thackeray slams bjp shinde sena | शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले


Uddhav Thackeray : 'छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे, तो मावळ्यांच्या हातात शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या हातात नाही. चाळीस जणांची टोळी आली अन् आपल्या पक्षावर दरोडा घालून पक्ष चोरुन नेला. आता म्हणतात हा पक्ष आमचा आहे. ते गद्दार, खोकेबाज आणि धोकेबाज आहेत,' अशी घणाघाती टीका शिवसेना(उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. ते बुलढाण्यात जयश्री शेळकेंच्या प्रचारसभेत बोलत होते.

मागच्या वेळी माझी चूक झाली
उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, 'ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे मित्रपक्ष आहेत. आपल्या विरोधात सगळे महाराष्ट्रद्रोही आहेत. छत्रपती शिवरायांचा झेंडा घेऊन नाचवत आहेत ते काही सगळेच मावळे नाहीत. गेल्या वेळी आपण चूक केली. मी निवडणुकीच्या प्रचारात फिरतोय, प्रत्येक ठिकाणी आपल्या विरोधात आपलाच गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच आहे ही चूक माझी आहे कारण यांना तिकिट विश्वास ठेवून मी दिलं होतं. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गद्दारांना निवडणून दिलं. आता त्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही."

पन्नास खोके नॉट ओके...
'छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. छत्रपती शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे तो मावळ्यांच्या हातात शोभतो दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही. आपल्या पक्षावर दरोडा घातला. चाळीस जणांची टोळी आली दरोडा घालून पक्ष चोरुन नेला. आता म्हणत आहेत की हा पक्ष आमचा आहे. पन्नास खोके आता नॉट ओके. यांनी एवढं कमावलं आहे की त्यांना हरवलं तरी काही फरक पडत नाही', असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. 

तुमचं तंगडं धरुन तुम्हाला...

ते पुढे म्हणतात, 'भाजपावाल्यांची कमाल वाटते की, तुम्ही दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येता? भाजपाला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात? तुमचं तंगडं धरुन तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिलं नाही, तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलणार नाही,' असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray : saffron flag does not look good in the hands of robbers; Uddhav Thackeray slams bjp shinde sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.