Uddhav Thackeray Interview: “देवेंद्र फडणवीसांबरोबर भाजप असे का वागले हे मलाही समजले नाही”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 09:10 AM2022-07-27T09:10:00+5:302022-07-27T09:10:00+5:30
Uddhav Thackeray Interview: पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपचे काम करताहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मर्मावर बोट ठेवले.
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठेच भगदाड पडले आहे. आता पक्ष वाचवण्याचे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असल्याचे सांगितले जात आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही आता कंबर कसली असून, ते अधिकच सक्रीय झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांबरोबर भाजप असे का वागले हे मलाही समजले नाही, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर रोखठोकपणे भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजप असे का वागले हे मलाही समजले नाही, पण ठीक आहे. तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षातले जुनेजाणते निष्ठावान, त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपसोबत आहेत. त्यांच्याबद्दल मला असा गैरसमज करू नाही द्यायचा की, त्यांना शिवसेनेसोबत यायचे आहे. मी उगाच असा पोकळ दावा करणारही नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपचे काम करताहेत. बाहेरच्या माणसांना सर्व दिलं जातंय. त्यांच्या डोक्यावरती बाहेरची माणसे बसवली. त्यावेळी वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून बाहेरचा माणूस. आता मुख्यमंत्रीपदी… इतर पदांवरही बाहेरचे. तरीही ते निष्ठा म्हणून काम करीत आहेत.
शिवसैनिकाकडून शिवसेना संपवायचीय
‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ असा सामना त्यांना महाराष्ट्रात घडवायचा आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर, बोलताना शिवसैनिकाकडून शिवसेना संपवायचीय, पण जे गेलेत ते शिवसैनिक नाहीत हे लक्षात घ्या!, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. तसेच माझी मुळातच मुख्यमंत्रीपद स्वीकारायचीच तयारी नव्हती. पण त्या काळात एका जिद्दीने मी ते केले, मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो, तर एका जिद्दीने झालो. मुख्यमंत्री झालो. जिद्दीच्या बळावर अडीच वर्षांच्या काळात माझ्या परीने कारभार केला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, पूर्वी अनेकांनी म्हटलंय की, ‘शिवसेना’ या निवडणुकीनंतर राहणार नाही वगैरे! मुंबईत आता मुंबईकर म्हणून सगळे एकत्र आलेत. त्यावेळी त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला की, हे मराठी ते अमराठी वगैरे, पण आता ही सगळी मंडळी मला येऊन भेटताहेत. मराठी, अमराठी अशी फूट पाडण्याचा प्रयत्न आजसुद्धा सुरू आहे. पण आता याला कोणी बळी पडणार नाही. मराठी माणसं एकवटली आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट बघतोय… आणि माझं मत असं आहे की, मुंबईच्याच नव्हे, तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.