"मी शांत आहे, याला माझी कमजोरी समजू नका", उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 03:07 PM2020-09-13T15:07:43+5:302020-09-13T15:12:20+5:30
उद्धव ठाकरे म्हणाले, संक्रमण रोखण्यात लोकांनी मोठे सहकार्य केले आहे, मी सर्वांचे आभार माणतो. आपल्याला कोरोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही. आपण सावध रहा, आम्ही जबाबदार राहू. आपल्याला आणखी काळजी घ्यावी लागेल. देशात करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, ठाकरे म्हणाले, राज्यातील जनतेने लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले आहे. या काळात जनतेने संयम दाखून सरकारला मदत केली. मात्र, अद्यापही कोरोना संकट संपलेले नाही. सरकारकडून जनजीवन सुरळीत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न सुरू आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या राजकारणावर बोलण्याची माझी इच्छा नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही, की माझ्याकडे उत्तर नाही. महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे, मी महाराष्ट्राच्या बदनामीवर बोलणार आहे.
विरोधकांना टोला -
विरोधक म्हणत आहेत, मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, त्यांनी घराबाहेर पडावे. मात्र, जेथे तुम्ही पोहोचला नाहीत, अशा ठिकाणीही मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने जाऊन आलो आहे. एवढेच नाही, तर अनेकांशी चर्चाही केली आहे आणि करत आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, संक्रमण रोखण्यात लोकांनी मोठे सहकार्य केले आहे, मी सर्वांचे आभार माणतो. आपल्याला कोरोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही. आपण सावध रहा, आम्ही जबाबदार राहू. आपल्याला आणखी काळजी घ्यावी लागेल. देशात करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला होणार सुरूवात -
उद्धव ठाकरे यांनी सांगितले, की आपण 15 सप्टेंबरपासून एक मोहीम सुरू करत आहोत. जे आपल्या महाराष्ट्रावर प्रेम करतात, त्या सर्व लोकांनी या मोहिमेत आपली जबाबदारी पार पाडावी. महाराष्ट्र आपले कुटुंब आहे आणि ते सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे. म्हणूनच आपण या मोहिमेचे नाव 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' असे ठेवले आहे. तसेच मास्क हाच आपला ब्लॅक बेल्ट आहे आणि तोच आपल्याला सुरक्षित ठेवेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
कोरोना काळातही राज्यात साडे २९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. सरकार शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या मागे खंबीरपणे उभे आहे.
राज्यातील साडेसहा लाख कुपोषित बालकांना पुढील वर्षभर मोफत भोजन देणार
शिवभोजन थाळी ५ रुपयात दिली, पावणेदोन कोटी थाळ्या राज्यभरात दिल्या जातात.
कोरोनासाठी ३० लाख ६० हजार बेड्स उपलब्ध आहे, यात ऑक्सिजन, आयसीयू आणि सामान्य बेड्सचा समावेश आहे. जिथे आवश्यकता असेल तिथे बेड्सची संख्या वाढवतो आहे.
औषधांचा पुरवठा करण्यात कमी पडत नाही, अशी कोणतीही बाब शिल्लक ठेवली नाही, जिथे सरकार म्हणून कमी पडलो आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागासाठी ७०० कोटी मदत केली आहे. या पूर्व विदर्भात तात्काळ १८ कोटी रुपयांची मदत पाठवली आहे. विदर्भाला पूर्णपणे मदत करणार, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या -
CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स
कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी
कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!