नृत्य स्पर्धेऐवजी स्वातीला पासचे २६० रुपये द्यायला हवे होते - उद्धव ठाकरे

By Admin | Published: October 26, 2015 11:52 AM2015-10-26T11:52:36+5:302015-10-26T11:54:19+5:30

राज्य सरकारने बँकॉकला जाणा-या नृत्य पथकाला पैसे देण्याऐवजी लातूरमध्ये बसच्या पासचे पैसे नसल्याने आत्महत्या करणा-या मुलीला मदत करायला हवी होती, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray should have given Rs 260 to Swati instead of dance competition | नृत्य स्पर्धेऐवजी स्वातीला पासचे २६० रुपये द्यायला हवे होते - उद्धव ठाकरे

नृत्य स्पर्धेऐवजी स्वातीला पासचे २६० रुपये द्यायला हवे होते - उद्धव ठाकरे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - राज्य सरकारने तिजोरीतून ‘बँकॉक’ला जाणार्‍या नृत्य कलापथकास आठ लाख रुपये दिले, मात्र लातूरमध्ये स्वाती या विद्यार्थीनीने बसच्या पाससाठी २६० रुपये नाहीत, म्हणून आत्महत्या केली, हे राज्यातील अस्वस्थ मानसिकतेचे विदारक चित्र आहे, अशी टीका करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. राज्यात फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच मित्रपक्ष शिवसेनेने भाजपवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.  अशा किती स्वाती आज महाराष्ट्रात आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत व सरकार त्यांचे जीव वाचविण्यासाठी काय करणार आहे, असा सवालही त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.  
देवेंद्र सरकार वर्षपूर्ती साजरी करीत असताना भाजप मंत्री वर्षपूर्तीचा सोहळा स्वतंत्रपणे साजरा करण्याच्या विचारात आहेत. सोहळा फार भव्यदिव्य नसला (दुष्काळाच्या कारणामुळे) तरी आमचे आम्ही एकटेच सण साजरा करू अशा भूमिकेत सत्तेतील आमचे मित्र आहेत, अशी टीका त्यांवनी केली. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकार्‍यांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे असे हे स्वातीचे आत्महत्या प्रकरण आहे, असंही लेखात नमूद करण्यात आले आहे. शिवसेनेने पाकिस्तानचे पुढारी कसुरी यांना विरोध केल्याने महाराष्ट्राची बदनामी झाली असे ज्यांना वाटते त्यांनी स्वातीच्या आत्महत्येने महाराष्ट्रावर पुष्पवृष्टी झाली काय ते सांगायला हवे, असा टोला  त्यांनी विरोधकांना हाणला आहे. 
एकेकाळी शिक्षणाचा ‘लातूर पॅटर्न’ महाराष्ट्रात प्रसिद्ध होता व लातूर पॅटर्नवर महाराष्ट्र फिदा होता. आता स्वातीच्या आत्महत्येने दुष्काळ, दारिद्य्र व आत्महत्येचा नवा ‘पॅटर्न’ उदयास येत असेल तर महाराष्ट्राला तो काळिमा आहे, अशी टीकाही लेखातून करण्यात आली आहे.  शेतकर्‍यांना मदत पोहोचावी व त्यांचे प्राण वाचावेत म्हणून शिवसेनेसारखा पक्ष मदत करत असून त्यात रोज सहकार्याच्या समिधा पडत आहेत, पण आत्महत्या रोखण्यात व स्वातीसारख्यांचे प्राण वाचविण्यात सरकार का कमी पडत आहे, असा सवाल उद्धव यांनी सरकारला विचारला आहे.

Web Title: Uddhav Thackeray should have given Rs 260 to Swati instead of dance competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.