नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला; कशी असेल नव्या शिवसेनेची नवी घटना?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 08:39 AM2023-03-07T08:39:37+5:302023-03-07T08:40:18+5:30

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूची कागदपत्रे तपासून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.

Uddhav Thackeray starts work for new party; How will the new constitution of Shiv Sena be? | नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला; कशी असेल नव्या शिवसेनेची नवी घटना?

नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला; कशी असेल नव्या शिवसेनेची नवी घटना?

googlenewsNext

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यात शिवसेनेत उभी फूट पडली. सहा महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा हाती घेत थेट उद्धव ठाकरेंच्याविरोधात भूमिका घेतली. त्याला शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदार आणि १३ खासदार यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पक्ष संघटनेवरील पकड कमकुवत झाली. त्यात खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला. हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहचला. 

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूची कागदपत्रे तपासून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. आता उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या पक्षाची नवी घटना निर्माण करण्यासाठी लीगल फर्मची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव सध्या ठाकरे गटाकडून सगळीकडे लावले जात आहे. तर मशाल चिन्हाचा वापर केला जात आहे. 

शिवसेना हा मूळ पक्ष हातातून गेल्यानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कामाला लागला आहे. नव्या घटनेत हा जुन्या शिवसेनेतील घटनेचा गाभा असणार आहे. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद नव्या पक्षातही कायम असेल. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचे सर्वाधिकार राहतील अशी माहिती मिळत आहे. 

ठाकरेंची नवी शिवसेना कशी असेल?  
नव्या शिवसेनेत उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख असतील.
नव्या पक्षाचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडेच
जुन्या शिवसेनेच्या घटनेचाच गाभा कायम ठेवणार
पक्षाची नवी घटना तयार करण्यासाठी कायदेतज्ज्ञांची टीम

उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षातील मोठा चेहरा
उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे असतील तर आपण एकत्र येत सरकार बनवूया असं ठरवले. विरोधी पक्षात उद्धव ठाकरेंचा चेहरा अधिक महत्त्वाचा वाटतो. महाराष्ट्र एक मोठे राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्याकडे उत्तम नेतृत्वगुण आहेत. २०२४ च्या राष्ट्रीय राजकारणात काहीही होऊ शकते असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 
 

Web Title: Uddhav Thackeray starts work for new party; How will the new constitution of Shiv Sena be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.