Uddhav Thackeray : नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश; राज्यात निर्बंधांना सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 05:18 AM2021-04-15T05:18:39+5:302021-04-15T07:22:25+5:30

Uddhav Thackeray : सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट  त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Uddhav Thackeray: Take stern action against violators, CM orders; The beginning of restrictions in the state | Uddhav Thackeray : नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश; राज्यात निर्बंधांना सुरुवात

Uddhav Thackeray : नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश; राज्यात निर्बंधांना सुरुवात

Next

मुंबई : ‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधांची अंमलबजावणी बुधवारी रात्री ८ वाजेपासून राज्यभरात सुरू झाली. संचारबंदीचे पालन योग्यरीतीने व्हावे यासाठी राज्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. कोणत्याही परिस्थितीत गाफिल राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे ते म्हणाले. 
सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
राज्याच्या टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनी रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळावा हे सांगताना ऑक्सिजन सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा हे सांगितले. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले.

ऑक्सिजन, रेमडेसिविरयांबाबत दक्षता घ्या  
-  ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचला. आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा , वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. 
-  सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट  त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गाेंधळ नकाे
विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

Read in English

Web Title: Uddhav Thackeray: Take stern action against violators, CM orders; The beginning of restrictions in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.