उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना न सांगता सह्या घेतल्या
By admin | Published: July 19, 2016 05:18 AM2016-07-19T05:18:39+5:302016-07-19T05:18:39+5:30
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यात संपत्तीवरून वाद निर्माण झाला.
मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यात संपत्तीवरून वाद निर्माण झाला. सोमवारी जयदेव ठाकरे यांची उलटतपासणी सुरू झाली. या उलटतपासणीत त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची मनस्थिती ठीक नसताना त्यांना न सांगताच अनेक कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या, असा दावा उच्च न्यायालयात केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रोहित कपाडिया यांनी व्हील चेअरवर बसलेल्या जयदेव ठाकरे यांची उलटतपासणी घेतली. जयदेव यांच्याबरोबर त्यांची तिसरी पत्नी अनुराधा आणि मुलगी माधुरीही न्यायालयात उपस्थित होती. जयदेव यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर त्यांना इंग्रजीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे भाषांतर करण्यासाठी दुभाष्या देण्यात आल्या. उलटतपासणीच्या पहिल्याच दिवशी जयदेव यांना ५८ प्रश्न विचारण्यात आले. काही प्रश्नांच्यावेळी जयदेव तणावात असल्याचे दिसले. त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरेठाकरे कुटूंबातील असून न्यायालयात सांगणे योग्य नाही, असे म्हणत टाळली.
तुम्ही (जयदेव) दावा केल्याप्रमाणे, उद्धव यांनी बाळासाहेबांची काही कागदपत्रांवर त्यांना न सांगता सह्या घेतल्या, त्या सह्या कशासाठी घेण्यात आल्या? असा प्रश्न जयदेव यांना करण्यात आल्यावर त्यांनी बाळसाहेबांची आणि आपली जानेवारी ते आॅक्टोबर २०११ मध्ये संपत्तीविषयी चर्चा झाल्याचे न्या. गौतपम पटेल यांना सांगितले.
‘बाळासाहेब मला संपत्तीत वाटा देणार होते, असे खुद्द बाळासाहेबांनीच मला सांगितले. मात्र आमच्यातले हे संभाषण मी उद्धवला कधीच सांगितले नाही. कारण बाळासाहेबांना या कारणामुळे आमच्यात वाद नको होते. म्हणूनच त्यांनी मला हे उद्धवला सांगू नकोस, असे सांगितले होते,’ असे जयदेव यांनी न्यायालयाला सांगितले. २०१३ मध्ये दावा दाखल केल्यानंतर उद्धव आणि आपले संभाषण झालेच नाही. मी त्याला मेसेज (मोबाईल) केला. मात्र त्याने (उद्धव) त्याला उत्तरही दिले नाही. माझ्याकडून हे संबंध चांगले आहेत,’ असेही जयदेव यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.
>2003
नंतर ‘मातोश्री’ मध्ये राहण्याची इच्छा झाली
नाही का? असा प्रश्नही
अॅड. कपाडिया यांनी
केला. ‘२००३ नंतर बाळासाहेबांकडे मी तशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र बाळसाहेबांनी ‘त्या’ घटनेमुळे काहीच न बोलणे पसंद केले,’ असे जयदेव यांनी उलटतपासणीत सांगितले.2011
मध्ये बाळासाहेबांनी इच्छापत्र तयार केले
तेव्हा त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती,
या आपल्या दाव्याचे समर्थन करणारे आठ साक्षीदार आहेत. मात्र उद्धवने त्यांच्यावर
दबाव आणला असावा, असेही जयदेव यांनी न्यायालयाल सांगितले. जयदेव यांची उलटतपासणी मंगळवारीही सुरू राहणार आहे. बाळासाहेबांच्या इच्छापत्राविषयी कसे कळले, असा प्रश्न विचारल्यावर जयदेव यांनी आपल्याला हे वर्तमानपत्रात छापून आलेल्या वृत्तावरून समजले, असे स्पष्ट केले.