युती तुटीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे ट्विटर ट्रेंडिगमध्ये..!

By Admin | Published: January 27, 2017 07:39 AM2017-01-27T07:39:41+5:302017-01-27T07:46:33+5:30

भाजपाशी गेल्या 25 वर्षांपासून असलेली युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर #Uddhav Thackeray हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला.

Uddhav Thackeray on twitter treading in the twitter! | युती तुटीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे ट्विटर ट्रेंडिगमध्ये..!

युती तुटीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे ट्विटर ट्रेंडिगमध्ये..!

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकावेल, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षांपासून  भाजपाशी असलेली युती तुटल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून शिवसैननिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
प्रत्येक गोष्टीबाबत आपले मत हिरहिरीने मांडणा-या नेटीझन्सहनीही या राजकीय घडामोंडीबाबत भाष्य नोंदवले आणि ट्विटरवर #Uddhav Thackeray हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला. 
26 जानेवारी रोजी युतीबाबतचा निर्णय जाहीर करू असे उद्धव यांनी स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे गोरेगावच्या एनएसई ग्राऊंडवर घेण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सोशल मीडियावर अनेक संदेश फिरण्यास सुरूवात झाली. 
 
 
 
 

Web Title: Uddhav Thackeray on twitter treading in the twitter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.