Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: कोणत्याही क्षणी निर्णय, सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला; शिंदे-ठाकरेंचा युक्तीवाद संपला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 02:00 PM2023-02-16T14:00:04+5:302023-02-16T14:00:33+5:30
Supreme Court on Maharashtra Political Crisis: सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल आज येईल, उद्या येईल किंवा आठ दिवसांनी येईल, कोणत्याही क्षणी येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडेच ठेवायचे की ७ जणांच्या खंडपीठाकडे सोपवायचे यावर आज निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस सलग सुरु असलेल्या सुनावणीतील युक्तीवाद, प्रतिवाद संपला आहे. यासाठी खंडपीठाने लंच ब्रेक पुढे ढकलला होता.
सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल आज येईल, उद्या येईल किंवा आठ दिवसांनी येईल, कोणत्याही क्षणी येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नबाम रेबिया, पाच की सात जणांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवायचे की नाही यावर खंडपीठाचे सदस्य चर्चा करतील. यानंतर पुढील निर्णय देतील, असे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले.
सात जजेसकडे हे प्रकरण गेले नाही तर एक ते दोन महिने याचिकेवरील निकालासाठी लागू शकतात. जर हे प्रकरण सात जणांच्या खंडपीठाकडे गेले तर निकालासाठी वर्ष लागू शकते, असे ते म्हणाले.
Supreme Court reserves its order on whether to refer the cases related to the Maharashtra political crisis to a larger seven-judge bench for reconsideration of a 2016 Nabam Rebia judgment on the powers of Assembly Speakers to deal with disqualification pleas. pic.twitter.com/CpU194kcqU
— ANI (@ANI) February 16, 2023
आज काय काय घडले...
"घटनेच्या १० व्या सूचीचा आधार घेऊन सरकार पाडण्यासाठी मार्ग तयार करुन देऊ नका. हे प्रकरण फक्त सध्यापुरतं मर्यादित नाही. यापुढील काळातही अशी प्रकरणं उद्भवू शकतात आणि १० व्या सूचीच्या आधारे देशातील सरकारं पाडू देऊ नका. हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होईल. निवडून आलेली सरकारे पाडली जातील. कोणत्याही लोकशाहीला ते परवडणारे नाही. त्यामुळे कृपया हे प्रकरण फक्त चर्चेचा विषय आहे असं म्हणू नका. मी तुमच्या पाया पडतो. दहाव्या सूचीच्या आधारावर सरकार पाडू देऊ नका", असा जोरदार युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे आणि दोन्ही पक्षाकडून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जोरदार युक्तीवाद सुरू आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत असताना सरन्यायाधीशांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. शिंदे गटाकडून बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे पुढची खेळी ओळखली गेली. पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहित होतं, असं विधान सरन्यायाधीशांनी केलं आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरन्यायाधीशांनी वरील विधान केलं आहे.
संघवी यांनी ठाकरे गटाकडून प्रतिवादाला सुरुवात केली होती. नबाम रेबिया प्रकरणानुसार निर्णय होऊ नये असे विरोधक म्हणत आहेत. परंतू तेच युक्तीवादात याचे दाखले देत आहेत, असे पलटवार संघवी यांनी केला आहे.