Sanjay Raut : पुढील पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:45 PM2022-05-31T12:45:58+5:302022-05-31T12:50:15+5:30

Sanjay Raut : आठ जूनला होणारी औरंगाबामध्ये येथील सभा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे सांगत सभेतून मराठवाड्यातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

Uddhav Thackeray will be the Chief Minister for next 25 years - Sanjay Raut | Sanjay Raut : पुढील पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार - संजय राऊत

Sanjay Raut : पुढील पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार - संजय राऊत

googlenewsNext

मुंबई : अडीच वर्षापूर्वी राज्यात समान किमान कार्यक्रमाच्या आधारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि शिवनेसेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. या महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे देखील दर्शन घेतले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे, असे साकडे घातल्याचे सांगितले. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, "सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सुप्रिया सुळे यांचे देखील हेच म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे हेच पुढील पंचवीस वर्षे मुख्यमंत्री राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे हा कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे."

राज्यसभा निवडणुकीवरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यसभेसाठी सहापैकी ज्यांनी सातवी जागा भरलेले आहे. त्यांना या राज्यांमध्ये घोडेबाजार करायचा आहे, असं दिसत आहे खरं तर त्यांच्याकडे एवढी मते नाही आहेत, जर मते असती तर त्यांनी नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केले असते. पण भाजपाने आधी छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला, त्यांना सहाव्या जागेसाठी उतरण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर त्यांना वार्‍यावर सोडले. आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

याचबरोबर, आश्चर्य वाटतं भाजपाचे दोन्ही उमेदवार महाराष्ट्राचे नसून ते बाहेरचे आहेत. जे भाजपाचे निष्ठावान आहेत, जे संघ परिवाराशी संबंधित आहेत, वर्षानुवर्ष काम करत आहेत, त्यांना डावलण्यात आल्याचे मी वाचले. जे इतर पक्षातून आले आहेत आणि शिवसेना, महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षातच नाराजी आहे, असे माझ्या वाचण्यात, पाहण्यात आलेले आहे. हा भाजपा जुना पक्ष राहिलेला नाही. अशाच बाहेरच्या  लोकांनी एकत्र येऊन पक्ष ताब्यात घेतला आहे. शिवसेनेत निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात आली आहे, असे संजय राऊत म्हणाले. याशिवाय, आठ जूनला होणारी औरंगाबामध्ये येथील सभा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे सांगत सभेतून मराठवाड्यातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार?
सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे देखील दर्शन घेतले. यावेळी येथील लोकांसोबत संवाद साधला. तसेच, या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार' असे साकडे घातल्याचे सांगितले. याचबरोबर, महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना "मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळे महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसे ठरवणार," असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

Web Title: Uddhav Thackeray will be the Chief Minister for next 25 years - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.