उद्धव ठाकरे भाजपला तगडा झटका देणार; नाराज खासदार राऊतांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:27 AM2024-04-02T11:27:41+5:302024-04-02T11:28:28+5:30
Unmesh Patil Meet Sanjay Raut: ठाकरे गटाने अद्याप जळगावचा उमेदवार जाहीर केलेला नाहीय. यामुळे भाजपच्या नाराज खासदाराने संजय राऊतांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे.
लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले भाजपा खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पाटील हे मुंबईत संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. यामुळे ठाकरे गट भाजपालाजळगावमध्ये तगडा झटका देण्याच्या तयारीत आहे.
उन्मेष पाटील हे जळगावचे खासदार आहेत. यावेळी भाजपाने पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांना भाजपातून अंतर्गत विरोध होता. तर महाविकास आघाडीमध्ये जळगावची जागा ठाकरे गटाकडे आली आहे. ठाकरे शिवसेनेकडून डॉ. हर्षल माने आणि माजी नगराध्यक्ष कुलभूषण पाटील हे इच्छुक आहेत.
ठाकरे गटाने अद्याप जळगावचा उमेदवार जाहीर केलेला नाहीय. यामुळे उन्मेष पाटील आणि राऊतांची भेट महत्वाची मानली जात आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील नाराज होते. ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
2019 मध्ये काय झालेले...
जळगाव मतदार संघातून भाजपचे आमदार असलेले उन्मेष पाटील हे ४ लाख ११ हजार ६१७ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. पाटील यांना ७ लाख १३ हजार ८७४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना ३ लाख २,२५७ मते मिळाली होती. राजकारणाचा कोणताही पुवार्नुभव नसताना वयाच्या ३६व्या वर्षी उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव विधानसभेची निवडणुक जिंकली होती. यानंतर ते खासदार झाले होते.