ठाकरेंना वाट पहावी लागणार! धनुष्यबाणावरील सुनावणी उद्या नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात नोंदच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 07:31 PM2023-04-23T19:31:08+5:302023-04-23T19:42:39+5:30

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे गटाला दिले होते. याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता.

Uddhav Thackeray will have to wait! The hearing on the bow and arrow symbol shivsena is not tomorrow, there is no record in the Supreme Court's proceedings | ठाकरेंना वाट पहावी लागणार! धनुष्यबाणावरील सुनावणी उद्या नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात नोंदच नाही

ठाकरेंना वाट पहावी लागणार! धनुष्यबाणावरील सुनावणी उद्या नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात नोंदच नाही

googlenewsNext

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना ठाकरे-शिंदे प्रकरणावर येत्या काही दिवसांत निकाल येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. उद्धव ठाकरे गटासह विरोधक गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त करत आहेत. अशातच उद्या होणारी निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण निर्णयाविरोधातील सुनावणी होणार नसल्याचे समोर आले आहे. 

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे गटाला दिले होते. याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. या याचिकेवर सुनावणीचा पुढील तारीख ही २४ एप्रिल ठरली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या कामकाजामध्ये या प्रकरणाचा उल्लेखच नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. 

सत्तासंघर्षाच्या निकालावर काही दिवसांत निकाल येणार आहे. यामुळे धनुष्यबाणाच्या याचिकेवरील सुनावणी या निकालानंतरच होण्याची शक्यता आहे. आता घेतली तर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात, असे राजकीय वर्तुळात अंदाज लावले जात आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Uddhav Thackeray will have to wait! The hearing on the bow and arrow symbol shivsena is not tomorrow, there is no record in the Supreme Court's proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.