युतीबाबत उद्धव ठाकरे आज भूमिका मांडणार, जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:17 AM2018-06-19T05:17:08+5:302018-06-19T05:17:08+5:30

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को संकुलात मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केंद्र व राज्य सरकारबाबत कोणती भूमिका मांडतात या बाबत उत्सुकता आहे.

Uddhav Thackeray will play a role today, strongly preparing for power | युतीबाबत उद्धव ठाकरे आज भूमिका मांडणार, जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

युतीबाबत उद्धव ठाकरे आज भूमिका मांडणार, जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Next

मुंबई : शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को संकुलात मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केंद्र व राज्य सरकारबाबत कोणती भूमिका मांडतात या बाबत उत्सुकता आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मातोश्रीवर झालेल्या दोन तासांच्या चर्चेनंतर उद्धव शिवसैनिकांसमोर पहिल्यांदाच बोलणार आहेत. शहा यांच्या भेटीनंतरही स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेनेकडून केली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीकास्रही रोजच्या रोज सोडले जात आहे. वर्धापन दिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यातील एका चर्चासत्राचा विषय ‘विकासाच्या नावाखालील अरिष्टे’ असा असून त्याचा रोख नाणारपासून बुलेट ट्रेनपर्यंतच्या प्रकल्पांकडे असेल. ‘शेती आणि शेतकरी जगण्या मरण्याच्या फेऱ्यात’ या विषयावरही चर्चासत्र होणार आहे. या मेळाव्यानिमित्ताने शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
>केजरीवाल यांना पाठिंबा
केंद सरकारविरोधात नवी दिल्लीत धरणे देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवर केजरीवाल यांच्याशी संपर्क साधून हा पाठिंबा दिला असल्याची माहिती शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी दिली.

Web Title: Uddhav Thackeray will play a role today, strongly preparing for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.