पाकिस्तानसोबतच्या चर्चेवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
By Admin | Published: January 23, 2016 09:08 PM2016-01-23T21:08:51+5:302016-01-23T21:08:51+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानसोबतच्या चर्चेवरुन भारतीय जनता पक्षाला टोला लगावला. मुंबईतील मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानसोबतच्या चर्चेवरुन भारतीय जनता पक्षाला टोला लगावला. मुंबईतील मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पाकिस्तानकडून देशात हल्ले होत आहेत आणि एकीकडे पाकिस्तानसोबत चर्चा सुरु आहेत.आपल्या चर्चांचा कंटाळा येऊन कदाचित पाकिस्तान कंटाळून हल्ले थांबवेल,असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. तसेच, आपण पाकिस्तानला त्यांच्यात शब्दात उत्तर कधी देणार,असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
आम्ही हिंदुत्वाची बाजू घेतली की आता असहिष्णू म्हटले जाते. हिंदू कसा असावा हे बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. माझ्या हिंदू बंधू-माता-भगिनींनो अशी भाषणाची सुरुवात करणारे बाळासाहेब युगपुरुष होते, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.