एवढ्या मोठ्या बंडात आमिष, मोह झुगारून शिवसेनेशी कायम राखली निष्ठा, उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून आमदारांचं केलं कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 10:03 AM2022-07-11T10:03:58+5:302022-07-11T10:31:35+5:30

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतरही १५ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांनी एक भावूक पत्र पाठवून त्यांच्या निष्ठेचं कौतुक केलं आहे. 

Uddhav Thackeray wrote a letter praising the MLA, saying ... | एवढ्या मोठ्या बंडात आमिष, मोह झुगारून शिवसेनेशी कायम राखली निष्ठा, उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून आमदारांचं केलं कौतुक, म्हणाले...

एवढ्या मोठ्या बंडात आमिष, मोह झुगारून शिवसेनेशी कायम राखली निष्ठा, उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून आमदारांचं केलं कौतुक, म्हणाले...

googlenewsNext

मुंबई - गेल्या महिन्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. या बंडामुळे उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच शिवसेनेमध्ये उभी फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र या फाटाफुटीमध्येही १५ आमदारांनीउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांनी एक भावूक पत्र पाठवून त्यांच्या निष्ठेचं कौतुक केलं आहे. 

या पत्रात उद्धव ठाकरे म्हणतात की, जय महाराष्ट्र! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय आहे.

शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या, प्रलोभनांना बळी न पडता आपण शिवसेनेसोबत राहिलात आपल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळाले. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, असे या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, ४० आमदारांनी बंड केल्यानंतरही आदित्य ठाकरे यांच्यासह वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रवींद्र वायकर, उदयसिंह राजपूत, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, नितीन देशमुख, कैलास पाटील आणि राहुल पाटील हे आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. 

Read in English

Web Title: Uddhav Thackeray wrote a letter praising the MLA, saying ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.