महागाईचा राक्षस खरंच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच आवश्यक, उद्धव ठाकरेंचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 08:32 AM2018-10-06T08:32:05+5:302018-10-06T08:32:35+5:30

पाच रुपयांची फुंकर म्हणजे नुसती वाऱ्याची झुळूक आहे. महागाईचा राक्षस खरेच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच करावी लागेल, असा सल्ला सामनामधील अग्रलेखातून सरकारला देण्यात आला आहे. 

Uddhav Thackeray's advice to Modi | महागाईचा राक्षस खरंच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच आवश्यक, उद्धव ठाकरेंचा मोदींना सल्ला

महागाईचा राक्षस खरंच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच आवश्यक, उद्धव ठाकरेंचा मोदींना सल्ला

Next

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दरात किरकोळ कपात करण्याच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून टीका केली आहे. इंधन दरवाढीच्या भडक्यावर सरकारने घातलेली पाच रुपयांची फुंकर म्हणजे नुसती वाऱ्याची झुळूक आहे. महागाईचा राक्षस खरेच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच करावी लागेल, असा सल्ला सामनामधील अग्रलेखातून सरकारला देण्यात आला आहे. 

करांच्या बेसुमार ओझ्यामुळेच पेट्रोल–डिझेलचे भाव गगनाला भिडतात,  असे सध्याचे  सत्ताधारी नेते विरोधी पक्षात असताना सांगत होते. त्यामुळे त्यामुळे केंद्र सरकारने मनात आणून करांचे ओझे कमी केले तर पेट्रोल–डिझेलचे दर अवघ्या 50 ते 60 रुपयांवर येऊ शकतील, असा अंदाज उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

- पेट्रोल-डिझेलच्या दररोज होणाऱ्या दरवाढीवरून देशभरात निर्माण झालेला असंतोष उशिरा का होईना सरकारच्या कानापर्यंत पोहोचला
- दोन्ही सरकारांनी पेट्रोल-डिझेलची किरकोळ का होईना दरकपात करण्याची घोषणा केली
-जनआक्रोश ध्यानात घेऊन छोटी का होईना दरकपात केली याबद्दल सरकारचे आभार
- मनमोहन सिंग पंतप्रधान असताना  कच्च्या तेलाच्या किमती थेट 143 डॉलर्स प्रति बॅरलवर जाऊन पोहचल्या तरीही एवढी दरवाढ झाली नव्हती
-  मात्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर तेलाच्या किमती 29 डॉलर्सपर्यंत घसरूनही आपल्याकडील पेट्रोल-डिझेलचे भाव चढेच राहिले
- केंद्र आणि राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवर जे सतराशे साठ प्रकारचे कर लादले आहेत तेच महागाईचे खरे मूळ 
- पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दराएवढीच रक्कम कराच्या रूपाने केंद्र आणि राज्य सरकार वसूल करते. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलचे दर दुपटीवर जाऊन पोहचतात
- केंद्राने मनात आणले आणि करांचे ओझे कमी केले तर पेट्रोल-डिझेलचे दर अवघ्या 50 ते 60 रुपयांवर येऊ शकतील
- पाच रुपयांची फुंकर म्हणजे केवळ वाऱ्याची झुळूक आहे. महागाईचा राक्षस खरेच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच आवश्यक

Web Title: Uddhav Thackeray's advice to Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.