कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By Admin | Published: August 11, 2016 08:22 AM2016-08-11T08:22:34+5:302016-08-11T08:23:40+5:30

पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षासोबत सत्तेत भागीदार असणा-या भाजपाने वेळीच सावरायला हवे, नाहीतर कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे

Uddhav Thackeray's BJP splits: Kashmir should not be seen as donkey and Brahmacharya too | कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 11 - दहशतवादी बु-हान वानीला हुतात्मा म्हणणारे पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचा नेते मुश्ताक अहमद शाह यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. सोबतच त्यांच्यासोबत सत्तेत भागीदार असणा-या आपल्या मित्रपक्ष भाजपालाही 'वेळीच सावरायला हवे. नाहीतर कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये', असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
 
‘हिजबुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुरहान वाणी हा दहशतवादी नव्हे तर हुतात्मा होता, असे अकलेचे चाँदतारे सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचा नेता मुश्ताक अहमद शाह यांनी तोडले आहेत. हे महाशय ‘पीडीपी’चे आमदारदेखील आहेत व भाजप त्यांचा सत्तेतील भागीदार, म्हणजे पार्टनरदेखील आहे. म्हणजे जम्मू-कश्मीरची सत्ता ही भाजपसाठी गळ्यातल्या हाडकासारखी अडकली की काय, असे वाटू लागले आहे असा टोमणा उद्धव ठाकरेंनी मारला आहे.
 
पीडीपीच्या आमदारांनी मारलेली ही नवी बांग म्हणजे नवे संकट ठरू नये म्हणजे झाले. बुरहान वाणी यास जे लोक हुतात्मा मानत आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे काय? बुरहान वाणीसारख्या अतिरेक्यांना ‘हीरो’ बनवू नका, असे पंतप्रधान मोदी तळमळीने सांगतात. त्याच वेळी भाजपचे कश्मीरातील ‘पार्टनर’ अतिरेक्यांना हीरो आणि हुतात्मा ठरवत आहेत असं उद्वव ठाकरे बोलले आहेत.
 
पीडीपी आमदारांचे म्हणणे असे की, ‘‘वाणी यांच्या महान आणि पवित्र व्यक्तिमत्त्वामुळे लोकांनी त्यांना प्रेम दिले.’’ म्हणजे ज्याला हिंदुस्थानद्रोही म्हणून आमच्या सैनिकांनी ‘अल्ला’सदनी पाठवले तो आता पवित्र आत्मा ठरवला जात आहे! बुरहान वाणी हा पवित्र आत्मा असेल तर मग कश्मीर खोर्‍यात शहीद होणार्‍या जवानांच्या आत्म्यांना काय म्हणावे बरे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
बुरहान वाणीच्या हत्येचा निषेध म्हणून पाकिस्तानात ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. त्या बुरहानची तुलना क्रांतिकारक, हुतात्मा, पवित्र आत्म्याशी ‘पीडीपी’वाले करतात हे भयंकर आहे. पीडीपी आमदार मुश्ताक अहमद शाह यांनी जी मुक्ताफळे उधळली ती भाजपास मंजूर आहेत काय, हे एकदा देशाला कळू द्या. अफझल गुरूस हुतात्मा ठरवणार्‍यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार! भाजपने वेळीच सावरायला हवे. नाहीतर कश्मीरप्रश्‍नी गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले असे घडू नये. प्रश्‍न राष्ट्रीय सुरक्षेचा व अखंडतेचा आहे म्हणून आम्ही हे पाल्हाळ लावले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 

Web Title: Uddhav Thackeray's BJP splits: Kashmir should not be seen as donkey and Brahmacharya too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.