"ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते देशाला कह्यात घेऊ इच्छित आहेत" उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 07:51 PM2023-07-06T19:51:51+5:302023-07-06T19:54:46+5:30

"ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचार सरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे."

Uddhav Thackerays direct attack on BJP Those who had nothing to do with the freedom struggle They are ruling the country | "ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते देशाला कह्यात घेऊ इच्छित आहेत" उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा

"ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते देशाला कह्यात घेऊ इच्छित आहेत" उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा

googlenewsNext

मुंबई - ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचार सरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तेथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मदी सरकारवर हल्ला चढवला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा (बाबुजी) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या 'जवाहर' या चरित्र ग्रंथाचे मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.

या वेळी, राज्याचे माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राजेंद्र दर्डा, विजय दर्डा तथा प्रल्हाद पै हे व्यासपीठावर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, बाबूजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तुरुंगवास भोगला. पुढे काय होणार? शाळेत कसे जाणार, कॉलेजमध्ये काय होणार? याचा नव्हे, तर देश माझा स्वतंत्र झाला पाहीजे, हा विचार होता. अशा असंख्य लोकांनी आपापल्या परीने त्याग केला, सोसलं, भोगलं म्हणून आपण आज सुखाने राहू शकतो. मात्र, आताच्या या राजकारणात माला सांगावसे वाटते की, ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचारसरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे. मग त्यावेळी बाबूजींनी जे केले, त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात आणायला हव्या. 

अगदी काँग्रेसच्या वाईट काळात इंदिरा गांधींसोबत उभे राहणे, ही काही गमतीची गोष्ट नव्हती संपूर्ण जग विरोधात होते. अनेक जण सांगतात आणीबाणी आणि त्यानंतरचा जनता पक्ष. आणीबाणीत जे अत्याचार झाले त्याचे समर्थन कुणीही करू शकत नाही. भले त्यावेळी चांगल्या अनुशासनासाठी शिवसेनेते पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर जे काही घडले त्याचे समर्थन कुणीही केले नाही. मात्र, आणीबाणीनंतर, ज्यांनी आणीबाणी लादली होती, त्यानी आपल्या विरोधात प्रचार करायला किमान लोकांना वाव तरी दिला. मोठ-मोठ्या जनसभा झाल्य. अनेक जण देशासाठी मैदानात उतरले आणि त्यांना उतरू दिले हीही एक वेगळी लोकशाहीच म्हणायला हवी, असेही ठाकरे म्हणाले.  

आता जे चालले आहे, बोलायचेच नाही. बोलायला लागले की, तोंडच बंद करून टाकायचे. खरे तर, आणीबाणी आहे की नाही, हा आजचा विषय नाही. पण, जेव्हा एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला आपण त्याच्या शताब्दीनिमित्त अभिवादन करायला जमतो, तेव्हा त्यांनी केलेल्या कार्यचे स्मरण करायला हवे, असेही ठाकरे म्हणाले. 

Web Title: Uddhav Thackerays direct attack on BJP Those who had nothing to do with the freedom struggle They are ruling the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.