'प्रायव्हेट जेटने उद्धव ठाकरे सहकुटुंब काल दुपारीच रवाना; आदित्य बेपत्ता होणार नाहीत अशी आशा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 01:01 PM2023-11-03T13:01:47+5:302023-11-03T13:02:12+5:30

आदित्य ठाकरे अडचणीत? सुशांत सिंह रजपूत आत्महत्येची सुनावणी लवकरच सुरु होतेय - नितेश राणे

Uddhav Thackeray's family left yesterday afternoon by private jet; Aditya Thackeray will be arrested soon' - Nitesh Rane | 'प्रायव्हेट जेटने उद्धव ठाकरे सहकुटुंब काल दुपारीच रवाना; आदित्य बेपत्ता होणार नाहीत अशी आशा'

'प्रायव्हेट जेटने उद्धव ठाकरे सहकुटुंब काल दुपारीच रवाना; आदित्य बेपत्ता होणार नाहीत अशी आशा'

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या नोकर, कुक यांना घेऊन काल दुपारीच डेहराडून गेल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. जरांगे पाटलांचे उपोषण सुटेस्तोवर थांबला का नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. सोबतच आदित्य ठाकरे बेपत्ता होऊ शकत नाहीत असेही राणे यांनी म्हटले आहे. 

ठाकरे कुटुंबीय काल दुपारी दोन वाजता एका खासगी विमानाने गेट नंबर ८ वरून डेहराडूनला निघून गेल्याचे मला कोणीतरी सांगितले. त्यांच्यासोबत त्यांचा कूक आणि स्टाफही आहे. हीच त्यांची मराठा आरक्षणाची काळजी आहे का? जरांगे पाटलांचे उपोषण सुटेपर्यंत का थांबला नाहीत, मग जे पक्षाचे काम करणाऱ्या, तुमच्यासारख्या पिकनिकवर न जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना दोष का द्यायचा, असा सवाल नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे. 

मला आशा आहे की आदित्य ठाकरे अटक टाळण्यासाठी कुठे बेपत्ता होणार नाहीत. सुशांत रजपूत प्रकरणाची कोर्टात लवकरच सुनावणी सुरु होईल, असेही राणे म्हणाले. इथे त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता बेबी पेंग्विन असे म्हटले आहे. यामुळे आदित्य ठाकरेंना अटक होणार का? ते देश सोडून जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Web Title: Uddhav Thackeray's family left yesterday afternoon by private jet; Aditya Thackeray will be arrested soon' - Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.