उद्धव ठाकरेच्या चार फाईल्स ईडीच्या कार्यालयात पडून, नारायण राणेंचा सनसनाटी आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 10:24 PM2019-04-20T22:24:08+5:302019-04-21T06:39:29+5:30

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप केले.

Uddhav Thackeray's four files in ED office, Narayan Rane's sensational Alligation | उद्धव ठाकरेच्या चार फाईल्स ईडीच्या कार्यालयात पडून, नारायण राणेंचा सनसनाटी आरोप 

उद्धव ठाकरेच्या चार फाईल्स ईडीच्या कार्यालयात पडून, नारायण राणेंचा सनसनाटी आरोप 

Next

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप केले. ''माझी इडीची कोणतीही चौकशी सुरू नाही मी कोणत्या ही बोगस कंपन्या स्थापन केल्या नाहीत. मात्र उध्दव ठाकरे यांच्या चार फाईल्स ईडीच्या कार्यालयात पडून आहेत. त्याची चौकशी सुरू आहे की नाही हे माहीत नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला. 

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महाराषट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा आज सावंतवाडी येथे झाली. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ''मी शिवसेनेच्या भ्रष्टाचार वर बोललो म्हणून शिवसेना मला टोकाचा विरोध करते. अनेकांनी शिवसेना सोडली मलाच विरोध होतो. शिवसेना सोडतना उध्दव ठाकरेवर भ्रष्टाचारांचे आरोप केला म्हणून शिवसेनेतून माझ्यावर टीका होते, असे नारायण राणे म्हणाले. 

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी इडीकडून कोणतीही चौकशी सुरू नाही. तसेच मी कोणत्याही बोगस कंपन्या स्थापन केलेल्या नाहीत. मात्र उध्दव ठाकरेच्या चार फाईल ईडीच्या कार्यालयात पडून आहेत. पण त्यांची चौकशी सुरू आहे का माहीत नाही.'' 

यावेळी शिवसेनेत पैसे देऊन तिकीटवाटप होते, असा आरोपही नारायण राणेंनी केला. मी शिवसेनेत असताना वेंगुर्ले येथील विधानसभेचे तिकिट बदलून पुष्कराज कोले यांना द्यायचे होते. त्यासाठी एक कोटी रूपयांची मागणी उध्दव ठाकरेनी केली होती. ही बाब मी शिवसेनाप्रमुखांच्या कानावर घातली होती.त्यानंतर शिवसेना प्रमुखांनी तिकिट बदलून कांबळीना तिकिट देण्यास भाग पाडले. या गोष्टीचा उद्धव ठाकरे यांना राग आला होता. तोच राग ते माझ्यावर काढत आहेत.''असा गौप्यस्फोटही नारायण राणे यांनी केला.  

Web Title: Uddhav Thackeray's four files in ED office, Narayan Rane's sensational Alligation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.