"उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते; शिवसेना मराठी सण साजरा करायला विसरली"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 03:59 PM2022-08-19T15:59:39+5:302022-08-19T16:00:15+5:30

नवाब मलिकांशी मैत्री केल्यानंतर शिवसेना गणपती विसरली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर गोविंदा साजरा करण्यासही विसरली असा टोला शेलारांनी शिवसेनेला लगावला.

"Uddhav Thackeray's government was anti-Hindu; Shiv Sena forgot to celebrate Marathi festivals - BJP Ashish Shelar | "उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते; शिवसेना मराठी सण साजरा करायला विसरली"

"उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते; शिवसेना मराठी सण साजरा करायला विसरली"

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्रात हिंदु सण साजरेच होणार नाही असं चित्र मागील महाविकास आघाडी सरकार काळात होते. कारण देशात कोरोना काळातही जगन्नाथ रथयात्रेपासून गंगेकिनाऱ्यापर्यंत यात्रा, उत्सव साजरे होत होते. परंतु उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते. मात्र आता सरकार बदललं असून हिंदु सण मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. मराठी माणसं जल्लोषात सहभागी होत आहेत असं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं. 

आशिष शेलार यांनी सांगितले की, प्रत्येक विषयाला निवडणुकीचं राजकारण करत नाही. मुंबईकरांचं स्वप्न आपलं मानून भाजपा काम करतेय. आज शहरात ३७० ठिकाणी भाजपाकडून दहिहंडीचा उत्सव साजरा करत आहे. घाटकोपरमध्ये आमदार राम कदम दरवर्षीप्रमाणे इथे दहिहंडी साजरी होतेय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवावर आधारित ही दहिहंडी आहे. मुंबईकर जनता ही भारतीय जनतासोबत आहे असं ते म्हणाले. 

त्याचसोबत नवाब मलिकांशी मैत्री केल्यानंतर शिवसेना गणपती विसरली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर गोविंदा साजरा करण्यासही विसरली. शिवसेनेच्या डोक्यात केवळ एक कुटुंब सोडून काहीच नाही. मुंबईकरांनी शिवसेनेला सोडलं आहे आणि भाजपाला जवळ केलंय. आमच्या हिंदु सणांवर महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना निर्बंध घातले गेले. मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा आली. परंतु आज सरकार बदललं आणि तरुणाईचा उत्साह, हिंदु सणाचा उत्साह पुन्हा पाहायला मिळतोय असंही आशिष शेलारांनी सांगितले. 

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडायला सुरुवात झाली आहे. आता आम्ही मुंबई महापालिकेतही भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच आणि विकासरुपी मलाई आहे ती गरिबांपर्यंत घेऊन जाण्याचं काम करणार आहोत असं सांगत वरळीतील जांबोरी मैदानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. भाजपा मुंबईकडून जांबोरी मैदानात दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात आला. त्याला फडणवीसांनी हजेरी लावली. 

Web Title: "Uddhav Thackeray's government was anti-Hindu; Shiv Sena forgot to celebrate Marathi festivals - BJP Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.