उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचा शंखनाद ?; पालघरमध्ये थेट उमेदवाराचीच घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 06:08 PM2018-06-07T18:08:26+5:302018-06-07T19:09:01+5:30
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
पालघर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 2019च्या पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी श्रीनिवास वनगांनाच देणार असल्याचा ठाम निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला आहे.
पालघरमधल्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे बोलत आहेत. यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. साम-दाम-दंड-भेदवाल्यांना सेनेनं घाम फोडला. पैसे वाटणा-यांवर अजून कारवाई का होत नाही. आता नाटकं सुरू आहेत, पिक्चर अजून बाकी आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी येत्या निवडणुकांत युती करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.पालघर निवडणुकीतील पराभव खिलाडू वृत्तीने नव्हे, तर कोणत्याच परीने मान्य करायला मी तयार नाही. उन्हामुळे जर यंत्र बंद पडत असतील तर मग चाचण्या कसल्या घेतल्या ?, नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली, याला लोकशाही म्हणतात का ?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या जाहीर सभेत उपस्थित केला आहे. किमान सहा लाखांच्या आसपास भाजपाच्या विरुद्ध मतं पडली.
पास वाटताना लोक पकडली याला लोकशाही म्हणतात का ?, एका आदिवासी पोराने केलेला हा तर भाजपाचा पराभव आहे, 15 दिवसांत अडीच लाख मते मिळाली, अजून आता आठ महिने आहेत. 2019ला श्रीनिवास वनगा खासदार झालाच पाहिजे. बुलेट ट्रेन, हायवे, बंदर यासाठी कोण काय बोलत पाहू, यांनी जे वादे मतदानावेळी दिले. काल भेटी झाल्या त्यात सांगितलं शिवसेना जनतेच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या समजून घेतल्या. शेतकऱ्यांचा म्हणणं आहे आमचा रस्त्याला विरोध नाही पण आमच्या जमिनी जात आहेत आयुष्य उधवस्थ होतंय. अनेकांनी जमिनी न देण्याबाबत सांगितलं. रक्त शिंपल्याशिवाय लोकशाही कळत नाही का, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.