उद्धव ठाकरे म्हणजे कालिया नाग आहे : विखे-पाटील
By admin | Published: October 3, 2016 10:43 PM2016-10-03T22:43:25+5:302016-10-03T22:43:25+5:30
'शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती, मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. त्यांनी मला गांडूळ म्हटलं
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 3- 'शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती, मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. त्यांनी मला गांडूळ म्हटलं पण गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. ते स्वतःला शेष नाग म्हणतात, सत्तेत आल्यापासून लाचारी पत्करून बिळात का गेला हा शेषनाग असा प्रश्न पडतोय, पण स्वत:ला शेषनाग म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे तर कालिया नाग आहेत.’ या शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
'माझ्या नावातही कृष्ण आहे. ते सत्तेत आल्यावर बिळात गेलेला बांडगूळ झालेत . त्यांनी मला ओसाड गावचा पाटील म्हटलं पण त्यांनी स्वतःचा गाव तरी सांगावं. असा हल्लाबोल विखे-पाटील यांनी अहमदनगर येथे बोलताना उद्धव ठाकरेंवर केला.
'मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पुरानं थैमान घातले. अशा परिस्थितीत सरकारनं त्वरीत अन्नछत्र सुरु करावं. शेतीचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरीत अर्थिक मदत करावी. त्याचबरोबर कर्जमाफी करावी. मागण्यांसाठी प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. मराठा समाज कोणाच्या ओबीसी अरक्षणावर अतिक्रमण करणार नाही. घटनेच्या चौकटीत अरक्षण मागत आहे, सरकारने याबाबत भुमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्र्यांनी वेळकाढू पणा करु नये, त्वरीत कायद्यात अवश्यक ती दुरुस्ती करुन आरक्षण द्यावं', असंही पाटील म्हणाले.