‘उद्धव यांचे नाचता येईना अंगण वाकडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:43 AM2017-07-19T00:43:53+5:302017-07-19T00:43:53+5:30
मुंबईत पाऊस पडतो तसा तो नवी मुंबईतही पडतो. परंतु, पहिल्याच पावसात मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली या शहरात पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबईत पाऊस पडतो तसा तो नवी मुंबईतही पडतो. परंतु, पहिल्याच पावसात मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली या शहरात पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत नाही, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला. मुंबईत पाऊस पडला तर त्याला बीएमसी जबाबदार कशी या ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना पवार म्हणाले की, उद्धव यांचे हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असा प्रकार आहे.
मागील २५ वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेचे हे अपयश असून केवळ कामांचे नियोजन नसल्यानेच आज या शहरांवर ही वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. पावसाळी पूराच्या पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन नसणे, पाइपलाईन व्यवस्थित न टाकणे, खड्डे पडणे हे सर्व नियोजन नसल्यानेच होत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.