युगांडा, केनियाचे पुढचे पाऊल

By admin | Published: December 5, 2014 10:55 AM2014-12-05T10:55:49+5:302014-12-05T11:17:06+5:30

युगांडा आणि केनिया हे दोन छोटेसे देश. पण, त्यांनीही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल भारतासारख्या महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशासाठी एक धडाच असल्याचे वास्तव येथील उच्चायुक्तांनी उलगडले.

Uganda, Kenya's next step | युगांडा, केनियाचे पुढचे पाऊल

युगांडा, केनियाचे पुढचे पाऊल

Next

संसदेत ३३ टक्केंहून जादा महिला : औद्योगिक कंत्राटांमध्येही आरक्षण

पुणे : आफ्रिकेतील युगांडा आणि केनिया हे दोन छोटेसे देश. पण, त्यांनीही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल भारतासारख्या महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशासाठी एक धडाच असल्याचे वास्तव येथील उच्चायुक्तांनी उलगडले. या दोन्ही देशांच्या भारतातील उच्चायुक्त महिलाच असल्याने त्या आवर्जून ‘लोकमत वुमेन समिट’च्या चर्चासत्रात सहभागी झाल्या होत्या.
‘स्टेटस आॅफ इंडो-अफ्रिकन वर्किंग वूमन’ या विषयावर परिसंवादात भारतातील युगांडाच्या उच्चायुक्त एलिझाबेथ पायला नापेयॉक आणि केनियाच्या उच्चायुक्त फ्लॉरेन्स इमिसा वेचे यांच्यासह खासदार विजय दर्डा सहभागी झाले होते.
युगांडा हा अजूनही टोळीपद्धत असलेला देश. विवाहाच्या वेळी मुलीच्या वडिलांना गायींच्या रूपाने हुंडा देण्याची येथील पद्धत होती. पण शिक्षणाच्या वाटेवर दमदार पावले टाकत येथील परिस्थिती बदलली असल्याचे सांगताना नापेयॉक म्हणाल्या, ‘‘आमच्या संसदेमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण आहेच. पण त्याचबरोबर सर्वसाधारण जागांतूनही महिला निवडून येतात. त्यामुळे ३०० सदस्यांच्या सभागृहात आता महिलांची संख्या १२० आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण पहिल्यापासून आहेच.’’
महिलांना केवळ राजकीय- सामाजिकच नव्हे, तर आर्थिक पातळीवरही स्वातंत्र्य देण्यासाठी केनियाने उचललेल्या पावलांची माहिती देताना फ्लॉरेन्स वेचे म्हणाल्या, ‘‘तर केनियामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी काढण्यात येणाऱ्या निविदांमध्येही महिलांसाठी आरक्षण आहे. व्यापार-उद्योगांत महिलांनी पुढे येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निर्णयप्रक्रियेत त्यांना स्थान देण्याचा प्रयत्न आहे.’’ खासदार दर्डा म्हणाले, ‘‘महिलांच्या प्रश्नांचे स्वरूप हे वैश्विक आहे. एक महिला संस्कारित झाली तर संपूर्ण कुटुंब संस्कारित होते, हे सर्वत्र दिसते. त्या दृष्टीने आपण महिलांना स्वतंत्र आणि गौरवास्पद स्थान देणे गरजेचे आहे.’’
-----------
’’ महिला ‘ट्रॉफी’’ आहेत याभावनेतून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते. लग्नाच्या वेळीस वर रितसर पैसे देऊन वधूला आपल्याकडे आणण्याची आजही केनियामध्ये प्रथा आहे. महिलांनी मुलालाच जन्म देण्याचा आग्रह केला जात होता.मुलीच जास्त काळजी घेतात, याची जाणीव होत आहे. मुलींना शिक्षण देण्याचे प्रमाण वाढत आहे.  - फ्लॉरेंस इमिसा विचे, केनियाच्या भारतातील उच्चायुक्त
------------
युगांडामध्ये जातिव्यवस्था नाही. टोळ्यांमध्येही आपसांत लग्न होतात. शिक्षण आणि डॉट कॉमच्या क्रांतीमुळे वधूसाठी हुंडा घेण्याची पद्धत बंद होत आहे. त्यामुळे हुंडा केवळ प्रतीकात्मक घेतला जातो. मुलींनी स्वत:ला सिद्ध केले असल्याने मुलगाच हवा ही मानसिकताही कमी झाली आहे. मुलीच अधिक काळजी घेतात, हे पटू लागले आहे.
एलिझाबेथ नापेयॉकन, युुगांडाच्या भारतातील उच्चायुक्त
------------
महिलेला संधी द्या... निवड चुकणार नाही
युगांडामध्ये गेल्या वर्षी अध्यक्षपदासाठी एक महिला रिंगणात होत्या. त्यांच्या प्रचाराचे सूत्रच होते महिलेला संधी द्या...तुमची निवड कधीही चुकणार नाही. याचे कारण म्हणजे महिला विचार करताना मेंदूबरोबरच हृदयापासून विचार करते. महिलेला संधी मिळाली की ती नेहमीच चांगले काम करते, असे एलिझाबेथ नापेयॉकन यांनी सांगितले. आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title: Uganda, Kenya's next step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.