युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सर्व विद्यापीठांना बंधनकारक : डॉ. भूषण पटवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 08:07 PM2020-07-09T20:07:36+5:302020-07-09T20:09:14+5:30
युजीसीने संभ्रम निर्माण केला नाही तर स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी )अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत कोणताही संभ्रम निर्माण केला नाही तर स्पष्ट सूचना दिल्या आहेत.परीक्षा कशा व कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबतचे नियम ठरविण्याचे अधिकार विद्यापीठांना आहे.विद्यापीठांना यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांनी परीक्षा घ्याव्यात, असे यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
अंतिम वर्षाच्या परीक्षेला याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सुधारित सूचनांमुळे गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे. तसेच युजीसीच्या निर्णयाला राजकीय रंग दिला जात असून काही विद्यार्थी संघटनांनी यूजीसीने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.
डॉ.पटवर्धन म्हणाले, यूजीसीने कोणताही संभ्रम निर्माण केला नसून २९ एप्रिल रोजी जे सांगितले होते.तेच ६ जुलै रोजी पुन्हा एकदा सांगितले आहे.केवळ जुलै ऐवजी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याबद्दल नमूद केले आहे.परीक्षा न देता पदव्या दिल्या तर चुकीचा पायंडा पडेल व शैक्षणिक दृष्ट्या हे योग्य होणार नाही.