उजनी धरण १०० टक्के भरले

By admin | Published: October 1, 2016 11:48 PM2016-10-01T23:48:18+5:302016-10-01T23:48:18+5:30

मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावली़ शिवाय पुणे परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे

Ujani Dam filled 100 percent | उजनी धरण १०० टक्के भरले

उजनी धरण १०० टक्के भरले

Next

- सिध्देश्वर शिंदे/ आॅनलाईन लोकमत
सोलापूर, दि.01 - मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावली़ शिवाय पुणे परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीने यंदाच्या वर्षी १०० टक्केचा आकडा गाठला आहे. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास उजनी धरण १००. 45 % टक्के झाल्याने शेतकरी, साखर कारखानदार, राजकारणी, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
उजनी धरण यावर्षी आतापर्यंतची सर्वात निचांकी पातळीवर आले होते़ त्यात गेल्या वर्षी पुरेसा पाऊस पडला नाही़ त्यामुळे यावर्षी उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये येणार की नाही याबद्दल शंका निर्माण करण्यात येत होती़ कारण उजनी मायनस ५३.५३ पर्यंत खाली आले होते़ त्यातच जुन-जुलै या महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे ६० दिवसात केवळ उजनीत ३२ टक्के पाणी आले़ आॅगस्ट उजडला तरी उजनी मायनस २८ टक्के एवढीच होती़ मात्र आॅगस्टमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने ६ दिवसात म्हणजे ६ आॅगस्टला उजनी धरणाने मायनसमधून प्लसमध्ये प्रवेश केला़.मृत साठ्यातील ५३ टक्के पाणीसाठा भरून निघण्यास तब्बल ६६ दिवस पावसाळ्याचे गेले़ ६ आॅगस्ट ते १ आॅक्टोबर या ५५ दिवसात उजनी धरणाने दोन टप्प्यात कधी वेगाने तर कधी संथगतीने उजनी धरण १०० टक्के झाले आहे.
.
उजनी धरण २८ वेळा गाठली शंभरी
उजनी धरण यावर्षी उशिरा का होईना १०० टक्के झाले आहे़ उजनी धरणाने त्याच्या इतिहासात ३६ वर्षात २८ वेळा शंभर टक्के भरले आहे़ त्यात सर्वात उशिरा २००९ साली १०० टक्के भरले़ तेही केवळ उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसावर कारण २००९ साली १९ धरणातून एक थेंबही पाणी उजनी धरणात आले नव्हते.

उजनी धरणाची पाणीपातळी
एकूण पाणीपातळी : ४९६.८१० मीटर
एकूण पाणीसाठा : ३३१३.३० द़ल़घ़मी
उपयुक्त साठा : १६१०़४९ द़ल़घ़मी
टक्केवारी : 100. 45 टक्के
विसर्ग : दौंड : ५०४६ तर बंडगार्डनमधून ३२८० ने पाणी येत आहे.

उजनीत ५००० अन जाते ३३००
उजनी धरण गेल्या चार पाच दिवसापूर्वी १०० टक्के होण्याची अपेक्षा होती़ परंतू दौड येथुन उजनीत येणाऱ्या विसर्गात कमालीची घट झाल्याने दररोज केवळ अर्धा, पाव टक्के पाणी वाढत गेले़ कारण दौंड येथुन उजनीत ५००० क्युसेसने विसर्ग येत होता अन ते आजही येत आहे़ उजनी कालव्याव्दारे १५०० क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे़ त्यामुळे येणारे ५००० क्सुसेक तर जाणारे ३३०० म्हणजेच केवळ १७०० क्सुसेकने उजनी वाढत आहे.

१२१ दिवसात १६३ टक्के पाणी झाले जमा
यावर्षी उजनी धरणात १२१ दिवसात १६३ टक्के पाणी म्हणजे १२३़६३ टीएमसी पाणी जमा झाले आहे़ उजनी मायनस ५३़५३ टक्के प्लस १०० टक्के पाणी उजनी धरणातून कालवा, बोगदा यातून ८़५० टीएमसी पाणी सोडले होते असे एकूण १२१ दिवसात १२५़६३ टीएमसी अर्थात १६३ टक्के पाणी जमा झाले आहे़ चार महिन्यात उजनी दररोज १ टीएमसी पाणी जमा झाले आहे.

उजनीतून भीमेत पाणी सोडण्याची शक्यता येणार
उजनी धरणाची शंभरी पूर्ण झाली आहे़ त्यात पावसाने सुरूवात केल्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के (१२३ टीएमसी) भरणार हे नक्की आहे़ त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.

७ धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात
उजनी धरणावरील १९ पैकी ४ धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे़ वडज ८३२, घोड ३०००, कलमोडी ३२०, भामा आसखेड २१०० तर शनिवारी दिवसभर पुणे परिसरातील ८ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. आंध्रा ५ मिमी, पवना ९ मिमी, कासारसाई ३० मीमी, मुळशी १३ मीमी, टेमघर २२ मीमी, वरसगांव १८ मीमी, पानशेत १५ मीमी एवढा पाऊस झाला आहे.

Web Title: Ujani Dam filled 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.