उजनी धरणाने गाठली मायनस ३५.६६ टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:53 AM2019-05-09T11:53:42+5:302019-05-09T11:56:50+5:30

उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या बेसुमार पाण्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.

Ujani Dam has reached 35.66 percent | उजनी धरणाने गाठली मायनस ३५.६६ टक्केवारी

उजनी धरणाने गाठली मायनस ३५.६६ टक्केवारी

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी धरणात सध्या एकूण पाणीपातळी ४८७.८६० मीटर आहेउजनीत राहिलेले पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट अनधिकृत वीजपंप तातडीने बंद करून त्याचा वीजपुरवठा तातडीने पूर्णपणे खंडित

भीमानगर : उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या बेसुमार पाण्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, त्यातच कृष्णा खोरे महामंडळाकडून पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र देऊन उजनी काठच्या भागातील पाण्याच्या उपशावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.

उजनी धरणात सध्या एकूण पाणीपातळी ४८७.८६० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १२६१.८२ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा मायनस ५४०.९९ दलघमी, उजनीची टक्केवारी मायनस ३५.६६ टक्क्यांवर गेली आहे. एकूण टक्केवारी ४४.५६ तर उपयुक्त टक्केवारी १९.१० आहे.

गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणीपातळी प्लस १४.९३ टक्के होती. यंदाच्या पातळीत बरीच घट दिसत आहे. अजून मे आणि जून हे दोन महिने पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने यंदा पाण्याचे संकट अधिक गडद होणार, असे जाणवत आहे.
उजनीत राहिलेले पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.

कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा व भीमा नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनेसाठी भीमा नदीवरील एक आवर्तन द्यायचे शिल्लक आहे. ते येत्या १५ मे रोजी सोडण्यात येणार आहे. येणाºया काळात वेळेत पाऊस न झाल्यास जुलै २०१९ नंतर पाणी पिण्यासाठी ठेवण्याची खबरदारीही यंत्रणेला घ्यावी लागणार आहे. 

या सर्वांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड व नगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा या तालुक्यातील उजनी धरणाकाठी असलेले अनधिकृत वीजपंप तातडीने बंद करून त्याचा वीजपुरवठा तातडीने पूर्णपणे खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Ujani Dam has reached 35.66 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.