उल्हास नदीची पातळी धोक्याबाहेर

By admin | Published: August 4, 2016 02:22 AM2016-08-04T02:22:33+5:302016-08-04T02:22:33+5:30

कर्जत तालुक्यात पावसाने सुरु ठेवलेला कहर पाहता मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे

Ulhas river level out of danger | उल्हास नदीची पातळी धोक्याबाहेर

उल्हास नदीची पातळी धोक्याबाहेर

Next


कर्जत : कर्जत तालुक्यात पावसाने सुरु ठेवलेला कहर पाहता मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. मात्र मध्येच पाऊस विश्रांती घेत असल्याने महत्त्वाच्या उल्हास नदीची पाण्याची पातळी जरी वाढली असली तरी पुराच्या पाण्याचा कोणताही धोका नाही.
तालुक्यातील संरक्षक कठडे नसलेल्या जामरु खजवळील चिल्लार नदीवर असलेल्या पुलाला मोठे झाड येऊन अडकून पडले आहे. दरम्यान, त्या झाडांमुळे पुलास कोणताही धोका पोहोचू नये म्हणून प्रशासनाने झाड बाजूला काढण्यासाठी त्वरित कर्मचारी लावल्याने ते झाड बाजूला करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील सर्वाधिक भागातून वाहणारी उल्हास नदीने पावसाळ्यात रौद्ररूप धारण केल्यास अर्ध्या तालुक्यात पुराचा धोका निर्माण होत असतो. यावेळी सतत पावसाची रिमझिम सुरु असताना देखील उल्हास नदीने एकदाही धोक्याची पातळी ओलांडली नाही. कारण पाऊस जसा पडत आहे, तसाच उघडीप देखील देत आहे. त्यामुळे आजच्या दिवसापर्यंत २00६ मि.ली. पाऊस होऊन देखील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली नव्हती.
तळकोकणात पावसाने कहर केलेला असताना कर्जतमध्ये आज सकाळपर्यंत ७२ मिली एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे खंडाळा येथे उगम पावणारी उल्हास नदी पाषाण येताना ३५ किलोमीटर अंतरात कोणताही धोका पोहचला नाही.
कर्जत येथे उल्हास नदी ४८ फूट उंची गाठल्यास धोकादायक पातळी ठरू शकते. बुधवारी सर्वत्र पावसाने हाहाकार माजविला असतांना उल्हास नदीची पाण्याची पातळी ४३ फूट एवढी होती. त्यामुळे उल्हास नदीला कोणताही धोका नसल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली.
दुसरीकडे सतत सुरु असलेल्या पावसामुळे जामरु ख परिसरातून वाहणाऱ्या चिल्लार नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तेथील रजपे, पाचखडकवाडी आणि धनगरवाडा भागात राहणाऱ्या लोकांसाठी पिंपरकरवाडा येथील क्षणभर विश्रांती या हॉटेलजवळ असलेल्या लहान पुलाला एक मोठे झाड अडकले आहे. त्या झाडाला जोरदार लाटा येऊन धडकत असतात. त्यामुळे आधीच कमकुवत असलेला, संरक्षक कठडे नसलेला हा पूल झाडांमुळे कोसळू शकतो. ही भीती लक्षात घेता या भागातील कार्यकर्ते प्रमोद पिंगळे यांनी कर्जत तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांना कळविले. त्यानंतर प्रशासनाने ते झाड बाजूला करण्यासाठी कर्मचारी पाठवून देण्यात आले. त्या सर्व कामगारांनी पुलाला अडकलेले झाड बाजूला करण्यास सुरु वात केली. (वार्ताहर)
पावसामुळे जामरु ख परिसरातून वाहणाऱ्या चिल्लार नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तेथील रजपे, पाचखडकवाडी आणि धनगरवाडा भागात राहणाऱ्या लोकांसाठी पिंपरकरवाडा येथील क्षणभर विश्रांती या हॉटेलजवळ असलेल्या लहान पुलाला एक मोठे झाड अडकले आहे. त्या झाडाला जोरदार लाटा येऊन धडकत आहेत.
कर्जतमध्ये बुधवारी सकाळपर्यंत ७२ मिली एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे खंडाळा येथे उगम पावणारी उल्हास नदी पाषाणे येथे खाली ठाणे जिल्ह्यात प्रवेश करीत असताना ३५ किलोमीटर अंतरात कोणताही धोका पोहचला नाही. नदीने ४८ फुटाची उंची गाठल्यास पुराचा धोका आहे.

Web Title: Ulhas river level out of danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.