उल्हासनगरात ३२५ धोकादायक तर ३० अतिधोकादायक इमारती
By admin | Published: May 10, 2014 08:07 PM2014-05-10T20:07:10+5:302014-05-10T20:59:05+5:30
महापालिकेने ३२५ धोकादायक तर ३० अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिध्द केली असून धोकादायक इमारतींचा वाज व पाणीपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.
उल्हासनगर - महापालिकेने ३२५ धोकादायक तर ३० अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिध्द केली असून धोकादायक इमारतींचा वाज व पाणीपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून शिश महल ही अतिधोकादायक इमारत येत्या आठवडयात जमिनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळयात वित्त व जिवित हाणी टाळण्यासाठी इमारतीच्या सर्वेक्षणासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. पालिकेने ३२५ धोकादायक तर ३० अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिध्द करून इमारतीना नोटीसा दिल्या आहेत. तर अतिधोकादायक इमारती मधिल नागरीकांना पोलिस संरक्षणात बाहेर काढून त्या इमारतींचा वीज व पाण पुरवठा खंडीत करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत़
आयुक्त बालाजी खतगावकर यंानी अधिका-ंयाची बैठक घेऊन धोकादायक इमारतींबाबत नियमावली तयार केलीउ आहे़ शिवाय यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकात अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त संतोष दहेरकर, शहर अभियंत्ता रमेश शिर्के तसेच प्रभाग अधिकारी व शाखा अभियंत्याचा समावेश आहे. हे पथक इमारतीचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतीची यादी नव्याने प्रसिध्द करणार असल्याने, धोकादायक इमारतीच्या संख्येत वाढ होणार आहे.
महापालिकेने गेल्या वर्षी ४ अतिधोकादायक इमारती जमिनदोस्त केल्या असून आर्थिक चणचणीमुळे उर्वरीत इमारतीवर पाडकामाची कारवाई ठप्प झाली होती.
दरम्यान आता आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयासमोरील शिश महल ही अतिधोकादायक इमारत पुढील आठवडयात जमिनदोस्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही इमारत जिर्ण झाली असून तिचा एकेक भाग कोसळत असल्याने परिसरात भिती निर्माण झाली आहे. दोन वर्षापूर्वी या इमारतीचा स्लॅब पडून ८ जणांचा बळी गेला होता़
महापालिकेकडे अपघातग्रस्तांसाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याने पावसाळयापूर्वीच अतिधोकादायक इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम करावे लागणार आहे.