उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करणाऱ्या उल्हासनगरमधील तरुणीला अटक
By सदानंद नाईक | Published: March 16, 2023 04:36 PM2023-03-16T16:36:10+5:302023-03-16T16:36:34+5:30
Ulhasnagar News: विविध गुन्हात फरार असलेला माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे व आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिष्का हिबे थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : विविध गुन्हात फरार असलेला माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे व आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिष्का हिबे थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मुंबई मधील मलबारहिल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुरवारी दुपारी पोलिसांनी तीला अटक केली. यापूर्वीही राष्ट्रपती, सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधिश आदींना गुजरात मधून समन्स पाठविणाराही उल्हासनगरचा असल्याचे उघड झाले होते.
उल्हासनगर येथील माजी नागरसेवक व क्रिकेट बुक्की अनिल जयसिंगानी हे विविध गुन्हे प्रकरणी फरार आहेत. त्यांच्या अनिष्का नावाच्या मुलीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग करून १ कोटींची ऑफर देत वडीलावरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव टाकला. आपल्यासह पती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडकविण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर, अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून मुंबई येथील मलबार हिल येथील पोलीस ठाण्यात अनिष्का जयसिंगांनी हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
गुरवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती विधानसभेत दिल्यावर एकच खळबळ उडाली. दुपारी मलबार हिल पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जय सिंगांनी यांच्या उल्हासनगर येथील घराची झडती घेऊन अनिष्काला अटक केली. याप्रकारने खळबळ उडाली असून प्रकारात स्थानिक नेत्यांचा सहभाग आहे का? याबाबत चौकशी करण्याचे संकेत पोलिसांनी दिले. अनिल जयसिंगांनी यांच्यावर क्रिकेट बुक्कीसह विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून ते फरार आहेत. अनिल जयसिंगांनी यांच्यावरील गुन्हे कमी करण्यासाठी मुलगी अनिष्काने हे कृत केल्याचे बोलले जात आहे. यामध्ये स्थानिक राजकीय नेत्यांच्या सहभाग आहे का? याबाबत चौकशीचे संकेत पोलिसांनी दिले.
राष्ट्रपती, सर्वाच्च न्यायाधीशांना समन्स
गुजरात न्यायालयातून थेट राष्ट्रपती, सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदींना समन्स काढल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी घडला होता. समन्स काढणारा इसम उल्हासनगर मधील बडा इसम असल्याचे उघड झाल्यावर एकच खळबळ उडून गुन्हा दाखल झाला होता. याप्रकाराने पुन्हा खळबळ उडाली आहे. अमृता फडणवीस यांना अनिष्का नावाच्या महिलेनं अप्रत्यक्षरित्या धमकावून, कट रचून 1 कोटींची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला होता.