उल्हासनगर महापालिकेतही महायुती कायम
By admin | Published: October 5, 2014 02:28 AM2014-10-05T02:28:33+5:302014-10-05T02:28:33+5:30
भाजपा आणि रिपाइंने शिवसेनेशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडली असली तरी उल्हासनगर महापालिकेत मात्र या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महापौरपद महायुतीकडेच कायम ठेवले.
Next
>शिवसेनेच्या महापौर : रिपाइंच्या उपमहापौर
उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा आणि रिपाइंने शिवसेनेशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडली असली तरी उल्हासनगर महापालिकेत मात्र या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महापौरपद महायुतीकडेच कायम ठेवले.सेनेने ठाणो आणि मुंबई महापालिकेतही सत्ता कायम ठेवण्यास युतीचाच आधार घेतला होता. आता पुन्हा सेनेला उल्हासनगरात तेच करावे लागले.
शनिवारी झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील तर उपमहापौरपदी रिपाइंच्या पंचशीला पवार निवडून आल्या. महायुतीतील साई पक्षाने ऐन वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्याने पालिकेवर पुन्हा कलानी कुटुंबाची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी खेळी केली. त्यांनी 4 अपक्ष नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, साई पक्षाचे प्रत्येकी दोन नगरसेवक फोडून पालिकेवर भगवा फडकवला.