उल्हासनगर महापालिकेच्या उसाटने डम्पिंगबाबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:47 PM2021-08-24T19:47:41+5:302021-08-24T19:49:03+5:30

महापालिकेच्या उसाटने गाव हद्दीतील डम्पिंग बाबत आयुक्त दयानिधी यांनी बोलाविलेल्या बैठकीला गावकऱ्यासह आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड उपस्थित होते.

ulhasnagar Municipal Corporation meeting on usatane dumping ground | उल्हासनगर महापालिकेच्या उसाटने डम्पिंगबाबत बैठक

उल्हासनगर महापालिकेच्या उसाटने डम्पिंगबाबत बैठक

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेच्या उसाटने गाव हद्दीतील डम्पिंग बाबत आयुक्त दयानिधी यांनी बोलाविलेल्या बैठकीला गावकऱ्यासह आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड उपस्थित होते. आयुक्तांच्या पहाणीनंतर सर्वांमतांनी पालकमंत्री व संबंधितांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

 उल्हासनगरातील डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर शासनाने उसाटने हद्दीतील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा महापालिकेला दिली. मात्र जागेची मोजणी व सरंक्षण भिंत उभारण्यासाठी गेलेल्या महापालिका उपायुक्त मदन सोंडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या व आमदार गायकवाडाच्या विरोधामुळे खाली हात परत यावे लागले. अखेर सत्ताधारी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन, त्याचे खापर आयुक्तांच्या अकार्यक्षमतेवर फोडले. दरम्यान आयुक्तांनी गावकरी व आमदार गणपत गायकवाड यांना मंगळवारी दुपारी बैठकीला बोलाविले होते. यावेळी डम्पिंग ग्राऊंडची जागा शाळे जवळ असल्याने, त्या जागे ऐवजी त्यापुढील जागा शासनाने द्यावी. असे आमदार गायकवाड यांनी म्हणणे आहे. 

महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी स्वतः उसाटने गाव हद्दीतील डम्पिंग ग्राऊंडच्या जागेची पाहणी करावी. आयुक्तांच्या पहाणीनंतर पालकमंत्री यांच्यासह संबंधितांची बैठक घेऊन शाळे पासून लांब जागा डम्पिंग ग्राऊंड साठी शासनाने महापालिकेला द्यावी. असे म्हणणे आमदार गणपत गायकवाड यांनी मांडले. बैठकीला उपमहापौर भगवान भालेराव, आयुक्त डॉ राजा दयानिधी, आमदार गणपत गायकवाड, कुमार आयलानी, उपायुक्त मदन सोंडे, मनीष हिवरे, विनोद केणी, गावकरी, ग्रामसेवक आदीजन उपस्थित होते. शहराचे आमदार कुमार आयलानी यांनी डम्पिंग ग्राऊंडच्या बैठकीत शहर हितार्थ बाजू मांडायला हवी होती. अशी टीका आयलानीवर होत आहे. 

महापालिकेकडून प्रतिक्रिया नाही

शहराच्या उसाटने गाव हद्दीतील डम्पिंग ग्राऊंड बाबत महापालिकेने बैठकीत कोणती बाजू मांडली. याबाबत आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त मदन सोंडे, सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्याशी संपर्क साधला. मात्र झाला नाही. महत्वाच्या विषयावर पालिकेने चुपकी साधल्याची टीका होत आहे.
 

Web Title: ulhasnagar Municipal Corporation meeting on usatane dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.